मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. शरद पवार यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.

कोरोना झाला असला तरी काळजी करण्याची गरज नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार सुरु असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घ्यावी आणि काळजी घ्यावी, असं शरद पवार यांनी आवाहन केलं आहे.

शरद पवार यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण काळजीचे कोणतेही कारण नाही. माझ्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी उपचार घेत आहे.

गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी घ्यावी आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असं पवारांनी म्हटलं आहे. तसेच शरद पवार यांनी ट्विटरवरुन काळजी करण्याचं कारण नसल्याचं सांगितलं आहे.

गेल्या काही दिवसामंध्ये महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना कोरोना संसर्ग झाल्याचं दिसून आलं होतं. आता शरद पवार यांना देखील कोरोना संसर्ग झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

“मी राजकारणातील कुंभार, मडकं फुटलं की नवं तयार करतो, मी अनेक नेते तयार केलेत”

“अरे बाबा, तुझे बाबा आम्हाला भेटत नाहीत, त्यामुळेच आम्हाला…”

अर्थसंकल्पापूर्वी रघुराम राजन यांनी मोदी सरकारला दिले हे महत्वाचे सल्ले, म्हणाले 

वामिकाची पहिली झलक पाहून नेटकरी म्हणाले,’अरे हा तर दुसरा विराट’