बिनकामी माणसं सरकार पाडण्याचा विचार करतात, पवारांचा फडणवीसांवर निशाणा

मुंबई |   ठाकरे सरकार अस्थिर असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून विरोधकांच्या गोटात सुरू आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर भाष्य करताना बिनकामी माणसंच सरकार पाडण्याचा विचार करू शकतात, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

राज्य सरकार कठीण परिस्थितीतून जात आहे. अशाच वेळी ज्यांच्याकडे काही काम नाही तेच अशा प्रकारचे उद्योग करू शकतात, असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसंच महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींवर सीएनएन न्यूज 18 या वृत्त वाहिनीशी पवार बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधी पक्षावर निशाणा साधला.

कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार काम करत आहे. राज्यासाठी हा अतिशय कठीण काळ आहे. अशा काळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप भाजपचं सरकार आणण्यासाठी प्रयत्न करत आहे, याचं मला आश्चर्य वाटलं, असं पवार म्हणाले.

आम्ही तिन्ही पक्ष या संकटाच्या काळात एकत्र आहोत. कोरोनावर नियंत्रण कसं मिळवायचं, त्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागती, यासंबंधी आम्ही चर्चा करतो आहोत. आमचं सरकार व्यवस्थित काम करतंय आणि हे सरकार पूर्ण 5 वर्ष काम करेल याचा मला विश्वास वाटतो, असंही शरद पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-‘बाबा तुमची नेहमी आठवण येते’; विलासरावांच्या आठवणीत रितेश भावूक, पाहा व्हिडिओ

-विमानातून आलेल्या ‘भावा’ला सन्मानाने पाठवलं, आम्ही अजून काय करायला हवं?- शाहिद आफ्रिदी

-“नारायण राणे शिवसेनेमुळे मोठे झाले अणि शिवसेनेमुळेच रस्त्यावरही आले”

-माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादवांचा पियुष गोयलांना टोला, म्हणाले…

-भाजपमधील माणसं सत्तेसाठी हपापलेली आहेत- पृथ्वीराज चव्हाण