मुंबई | करुणा शर्मा यांनी निवडणूक लढण्याची घोषणा करताच धनंजय मुंडेंवरही निशाणा साधला. यावेळी बोलताना त्यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत.
निवडणुकीचा अर्ज भरण्याआधी त्या कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना हे आरोप केलेत.
धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले लपवली. अनेक बायकाही लपवल्या. त्यांना पुढे निवडणुकांमध्ये मोठ्या अडचणी येणार आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. यावर प्रतिक्रिया देत भाजप नेते निलेश राणे यांनी धनंजय मुंडेंवर टीकास्त्र सोडलं आहे.
करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांनी केलेल्या आरोपानंतर निलेश राणे यांनी ट्विट केलं आहे. धनंजय मुंडेंना स्वतःची IPL टीम बनवायचीये वाटतं, असा खोचक टोला निलेश राणेंनी धनंजय मुंडेंना लगावला आहे.
धनंजय मुंडे यांना हिंदूंचे कायदे लागू होत नाहीत का? ह्याची आमदारकपण रद्द होते. कारण याने निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिली. त्यांनी स्वतः मान्य केले आहे. याला जंगलात पाठवा. पिसाळलाय… , अशी बोचरी टीका निलेश राणेंनी धनंजय मुंडेंवर केलीये.
दरम्यान, करुणा आणि धनंजय यांची प्रेमकहाणी लवकरच मराठीत येणार असून त्याच्यावर सध्या काम सुरू आहे.
करूणा शर्मा यांनी केलेल्या या आरोपामुळे मुंडेंच्या अडचणी वाढणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
धनंजय मुंडे ला स्वतःची IPL टीम बनवायची आहे वाटतं… मुंडे 11
हिंदूचे कायदे धनंजय मुंडे ला लागू होत नाही का?? ह्याची आमदारकी पण रद्द होते कारण याने निवडणुक आयोगाला खोटी माहिती दिली, त्यांनी स्वतः मान्य केले आहे.
याला जंगलात पाठवा, पिसळलाय. https://t.co/7vcRcJZaqO— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 24, 2022
महत्त्वाच्या बातम्या-
CSK च्या चाहत्यांसाठी अत्यंत धक्क्दायक बातमी; धोनीने घेतला ‘हा’ निर्णय
पुतिन यांना सर्वात मोठा झटका; युद्धामुळे लेकीचा…
करूणा शर्मांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या नव्या आरोपाने खळबळ!
“माझी आर्थिक परिस्थिती असती, तर मीच गुजरात फाईल्स काढला असता”
अजित पवारांनी सभागृहात उडवली प्रविण दरेकरांची खिल्ली, म्हणाले…