‘मी गुलजार यांच्याकडे टेनिस स्कर्ट मागितला अन् त्यांनी…’; नीना गुप्तांचा खुलासा

मुंबई | अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) त्यांच्या बिनधास्त बोलण्यामुळे अनेकवेळा चर्चेचा विषय ठरल्यात. आता पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत. नुकतंच केबीसी 13 मध्ये नीनी गुप्ता यांनी हजेरी लावली आहे. यावेळी त्यांनी सांगितलेल्या एका किस्स्याने त्या सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

अमिताभ यांनी ‘नीनाजी आम्ही ऐकलं आहे की तुम्ही खूप टेनिस खेळला होतात’ असं म्हटलं आहे. त्यावर नीना गुप्ता यांनी गुलजार यांच्यासोबत टेनिस खेळतानाचा अनुभव सांगितला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

मी आणि गुलजार साहेब खूप आधी टेनिस खेळायचो. ते अंधेरीला टेनिस खेळायला जात असत. एक एक तास टेनिस खेळायचे. मी एकदा त्यांना जाऊन म्हटलं की मलाही टेनिस खेळायला आवडेल. तेव्हा ते म्हणाले की तूही माझ्यासोबत खेळायला चल. ते मला रोज सकाळी सहा वाजता घ्यायला यायचे, असं नीना गुप्ता यांनी सांगितलं आहे.

मी अर्ध्या तासात टेनिस खेळून थकत असे. मग मी त्यांना टेनिस खेळताना पाहात असत. ते खूप छान टेनिस खेळायचे, असं नीना गुप्ता यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे.

सुरुवातीला टेनिस खेळायला जात असताना मी गुलजार यांना म्हटलं की सर जेव्हा बाहेर जायचं असेल तेव्हा मला टेनिस खेळताना घालतात तो स्कर्ट हवा आहे. जसं की मार्टीना घालते. मी गुलजार यांच्याकडे टेनिस स्कर्ट मागितला आणि ते ऐकून गुलजार साहेब माझ्यावर प्रचंड चिडले असल्याचं नीना गुप्तांनी सांगितलं.

दरम्यान,दरम्यान, बॉलिवूडमधली धाडसी अभिनेत्री म्हणून नीना गुप्ता यांची ओळख आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयाने दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत.

याआधीही सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत नीना गुप्ता यांनी विवाहित पुरुषाच्या प्रेमात न पडण्याचा सल्ला दिला होता. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी त्याठिकाणी स्वतःचा अनुभव सांगितला होता.

महत्वाच्या बातम्या-

“अजित पवारांकडून एकदा चूक झाली, तुम्ही कशाला रात्रीचे उद्योग करता” 

आदित्य ठाकरे येताच नितेश राणेंकडून ‘म्याऊ… म्याऊ’च्या घोषणा, पाहा व्हिडीओ 

शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता; ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर? 

‘आपला बाप आजारी असताना…’; उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना आव्हाडांनी झाप झाप झापलं 

Corona लस घेतलेल्यांसाठी गुड न्यूज; ‘ही’ दिलासादायक बातमी आली समोर