“Omicron मुळे भारतात दररोज 2 लाख रूग्ण आढळणार”, तज्ज्ञांच्या दाव्याने सर्वांची झोप उडाली

मुंबई | मागील दोन वर्षात कोरोनाने धुमाकूळ घातला होता. गेल्या 2 महिन्यांपासून कोरोनारूग्ण कमी होताना दिसत होती. अशातच कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्राॅनने हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. (Omicron will cause a third wave in India)

दक्षिण अफ्रिकेमध्ये पहिला ओमिक्राॅनचा रूग्ण आढळला होता. त्यानंतर आता जगातील 100 हून अधिक देशात ओमिक्राॅन पसरला आहे. पाश्चिमात्य देशात देखील मोठ्या प्रमाणात रूग्णसंख्या वाढत असल्याने काही ठिकाणी लाॅकडाऊन करण्याची देखील वेळ आली आहे.

अशातच आता भारतात देखील ओमिक्राॅनने केंद्र सरकारचं टेन्शन वाढवलं आहे. सध्या भारतात 236 ओमिक्राॅनचे रूग्ण आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारने राज्यांना सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे. अशातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी इशारा देण्यात आला आहे.

डेल्टा व्हेरियंटपेक्षा ओमिक्राॅन हा तिप्पट वेगाने पसरतो, त्यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांना साधव केलं आहे. अशातच राष्ट्रीय कोविड 19 सुपर मॅडलचे समितीचे सदस्य विद्यासागर यांनी दिलेल्या माहितीमुळे आता सर्वांच्या चिंता वाढल्या आहेत.

पुढील वर्षाच्या सुरूवातीला भारतात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, असं विद्यासागर यांनी सांगितलं आहे. सध्या देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण झालं असल्याने कोरोनाची ही तिसरी लाट कमी धोकादायक असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.

लसीकरणामुळे लोकांच्या शरिरात प्रतिकारशक्ती वाढत आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेपेक्षा तिसरी लाट हलकी असेल, असंही विद्यासागर म्हणाले आहेत.

सध्या देशातील 85 टक्के लोकांना कोरोना लसीकरणाचा पहिला डोस मिळाला आहे. तर 55 टक्के लोकांना दुसरा डोस मिळाला असल्याचं देखील विद्यासागर यांनी यावेळी म्हटलं आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत दररोज 1.8 लाख कोरोना रूग्ण आढळण्याची शक्यता आहे. पण प्रकरणे दोन लाखांपेक्षा जास्त नसतील, असंही विद्यासागर यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘…तर मलाही बाहेर काढा’; भर सभागृहात अजित पवारांनी आमदारांना सुनावलं

“…तर मी नाक घासून चंद्रकांत पाटलांची माफी मागेल”

आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी, फडणवीस म्हणाले ‘मी स्वत: कर्नाटकात जातो अन्…’

आदित्य ठाकरे येताच नितेश राणेंकडून ‘म्याऊ… म्याऊ’च्या घोषणा, पाहा व्हिडीओ 

शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता; ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर?