मुंबई | एकेकाळी जागतिक क्रिकेटवर वेस्ट इंडिज संघाचा दबदबा होता. याच काळात भारतीय क्रिकेट संघानं बलाढ्य अशा वेस्ट इंडिजला नमवत 1983 साली विश्वचषक आपल्या नावावर केला होता. (Ranveer Singh KISS to Kapil Dev)
भारतीय संघाने 1983 चा विश्वचषक जिंकून भारतीयांच्या मनात क्रिकेटबद्दल आपुलकी निर्माण केली. याच 1983 च्या विश्वचषकावर आता अभिनेता रणवीर सिंगचा ’83’ नावाचा चित्रपट येत आहे.
सर्वजण आतुरतेनं वाट पाहत असणारा हा सिनेमा उद्या म्हणजेच 24 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. त्याआधी मुंबईमध्ये सिनेमाच्या निर्मात्यांनी प्रिमियम केला होता. त्यानंतर आता त्यातील एक फोटो तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
प्रिमियममध्ये सर्व दिग्गज कलाकारांनी रेड कार्पेटवर एन्ट्री केली होती. त्यावेळी घडलेला एक किस्सा सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या प्रिमियममध्ये रणवीर आणि कपिल देव यांनी गळाभेट घेतली.
रणवीर आणि कपिल देव यांनी मीडियासाठी पोज देताना अनेक फोटो क्लिक केले. कपिल देव आणि रणवीरची मस्ती करताना यावेळी कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्यावेळी काढण्यात आलेला एक विचित्र फोटो व्हायरल होत आहे.
रणवीर सिंग आणि कपिल देव यांचा किस करतानाचा एक फोटो सध्या व्हायरल झातोय. कॅमेऱ्याच्या अॅगलमुळे असा फोटो आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोशल मीडियावर हा फोटो पाहिल्यावर अनेकांना आश्चर्य देखील व्यक्त केलं आहे.
उद्या प्रदर्शित होणारा 83 सिनेमा सर्वांसाठी खास आहे. ज्यावेळी भारताने 83 चा विश्वचषक जिंकला त्यावेळी सामना पाहण्याची उपलब्धता नव्हती. त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून 83 च्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत.
दरम्यान, कपिल देव यांच्या इच्छाशक्तीच्या जोरावर भारताने 83 चा विश्वचषक जिंकला होता, असं त्यावेळचे सर्वच खेळाडू सांगतात. त्यामुळे हा चित्रपट रणवीर सिंगला आणि कपिल देवला एका वेगळ्या उंचीवर पोहचवू शकतो.
महत्वाच्या बातम्या-
‘मी गुलजार यांच्याकडे टेनिस स्कर्ट मागितला अन् त्यांनी…’; नीना गुप्तांचा खुलासा
“अजित पवारांकडून एकदा चूक झाली, तुम्ही कशाला रात्रीचे उद्योग करता”
आदित्य ठाकरे येताच नितेश राणेंकडून ‘म्याऊ… म्याऊ’च्या घोषणा, पाहा व्हिडीओ
शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता; ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर?
‘आपला बाप आजारी असताना…’; उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना आव्हाडांनी झाप झाप झापलं