मुंबई | दोन वर्षे कॅन्सरशी लढा दिल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी 30 एप्रिल रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टी हळहळली. गेल्या दोन वर्षांचा काळ त्यांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत कसोटीचा होता. या संपूर्ण परिस्थितीत अंबानी कुटुंबीयांनी त्यांची साथ दिली. याबद्दल नीतू कपूर यांनी अंबानी कुटुंबाचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत.
इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित नीतू कपूर यांनी अंबानींचे आभार मानले आणि गेली दोन वर्षे ऋषी कपूर यांनी कॅन्सरशी कसा लढा दिला होता याबद्दल नीतू कपूर यांनी सांगितलं आहे.
गेल्या दोन वर्षांचा काळ हा आमच्यासाठी एक मोठा प्रवासच होता. काही चांगले दिवस असतात तर काही वाईट दिवससुद्धा असतात. भावभावनांनी ओथंबलेला हा काळ होता. मात्र हा प्रवास अंबानी कुटुंबीयांच्या मदतीशिवाय, प्रेमाशिवाय पूर्ण झालाच नसता. या कुटुंबासाठी मी फार कृतज्ञ आहे, असं नीतू कपूर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, ऋषीजींना वैद्यकीय मदत असो किंवा मग स्वत: येऊन त्यांची भेट घेणं असो अंबानी कुटुंबाने खूप मदत केली. आम्ही घाबरलेलो असताना त्यांनी आमची साथ दिली. तुमच्यासाठी असलेली कृतज्ञतेची भावना मी शब्दांत मांडू शकत नाही आणि ती मोजूही शकत नाही. आमच्या संपूर्ण परिवारातर्फे मी तुमचे खूप आभार मानते, अशी भावूक पोस्ट नीतू कपूर यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“इस्रायल कोरोना विरोधात लस निर्मितीपासून काही पावलं दूर”
-“नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भक्तांकडे या प्रश्नाचं उत्तर आहे का?”
-‘तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असाल आणि परदेशात अडकला असाल तर…’; ठाकरे सरकारचं आवाहन
-‘या’ राज्यात दारूवर 70 टक्के कोरोना फी; सरकारच्या निर्णयाने तळीरामांची पंचायत
-“दारू विक्रीसंबंधी केंद्राच्या सूचना असल्या तरी राज्य सरकारने घाई करू नये”