Top news कोरोना देश विदेश

कोरोना संपत नाही तोच चीनमध्ये आलं नवं संकट; आलाय ‘हा’ नवा व्हायरस

नवी दिल्ली | पाच-सहा महिन्यांपूर्वी जगभरात सर्व काही सुरळित चाललं होतं. पण चीनच्या वुहानमधून एक विषाणू बाहेर पडला. हा विषाणू नुसता चीनपुरताच नाही तर संपूर्ण जगभरात अतिशय कमी कालावधीत पोहोचला. सर्वच देशांची आर्थिक आणि एकूणच स्थिती पूर्णपणे बिघडली आहे. यातच आता चीनमध्ये अजून एक विषाणू आला आहे.

तेथील शास्त्रज्ञांना कॅट क्यू या नव्या विषाणूचे संकेत मिळाले आहे. यामुळे आता कोरोनाबरोबरच कॅट क्यूच्या नव्या विषाणूमुळे चिंता वाढली आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था (आयसीएमआर) यांनी माहिती दिली की, कॅट क्यू विषाणूमुळे ताप, मेंदूज्वर, ताप मेंदूपर्यंत जाणे अशा विविध समस्या यामुळे होतात.

भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेच्या (आयसीएमआर) पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही) सात शास्त्रज्ञांनी सांगितले की, चीन आणि व्हिएतनाममध्ये क्यूलेक्स मच्छरांमध्ये आणि डुक्करांमध्ये कॅट क्यू आढळला आहे. भारतात क्यूलेक्स मच्छरांची प्रजातीचा विस्तार होत असल्यामुळे कॅट क्यू वाढण्याची शक्यता दिसत आहे.

त्याचबरोबर शास्त्रज्ञांनी सांगितले की, चीनमध्ये क्यूलेक्स आणि व्हिएतनाममध्ये डुक्करांमध्ये कॅट क्यू आढळला आहे. यामुळे संपूर्ण आशिया खंडात हा विषाणू सक्रिय होण्याची शंका व्यक्त केली जात आहे. काही राज्यांमध्ये ८८३ नमुन्यांच्या तपासात दोन नमुन्यांची अँटिबॉडी त्यात आढळली आहे.

यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, कमीत कमी दोन लोकांना या विषाणूच्या संपर्कात आले आहे. पण तपासणी केल्यावर त्या व्यक्तींच्या शरीरात तो विषाणू आढळला नाही. शास्त्रज्ञांनी माहितीनुसार दोन नमुन्यात या विषाणूतील अँटिबॉडी आणि मच्छरांमुळे कॅट क्यू तेजीने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चच्या जून महिन्यातील अंकात एक अहवाल छापून आला आहे. त्यात कॅट क्यू विषाणूचे संकट आधीच समजण्यासाठी माणसे आणि डुक्करांचे काही नमुने तपासण्याची गरज आहे, असं त्यात म्हणलं आहे.

भारतीय संदर्भानुसार मच्छरांच्या काही प्रजाती एजिप्टी, सीएक्स आणि सीक्यूवी अशा विविध प्रजाती याबाबत खूपच संवेदनशील आहे. विज्ञानाच्या एका अहवालानुसार सीक्यूवी मच्छरांद्वारे हा विषाणू सहजच मानवी शरीरात पोहोचू शकतो.

आयसीएमआरच्या एका अहवालानुसार स्थानिक डुक्करांसारख्या अन्य प्राण्यांमध्ये हा विषाणू आढळला आहे. त्यातच चीनमध्ये डुक्करांमध्ये या विषाणूचे अँटिबॉडी आढळले आहे. यावरून स्पष्ट होते की, कॅट क्यू हा विषाणू स्थानिक स्तरावर एक प्राकृतिक चक्राद्वारे विकसित झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक! मुंबईत आणखी एका अभिनेत्याची गळफा.स घेऊन आत्मह.त्या

अनुराग कश्यपला अट.क होणार? तब्बल 8 तास चौकशी करत पोलिसांनी अनुरागला…

सुशांत केसमध्ये खरंच अरबाज खानला अटक केलंय का?, जाणून घ्या काय आहे सत्य

ड्र.ग्ज काय आहे?, अभिषेक बच्चनच्या उत्तराने चाहते झाले हैराण

“सुशांतच्या मृ.त्युच्या आदल्या दिवशी रिया सुशांतला भेटली होती!”