“नितेश राणे हरवला आहे, शोधणाऱ्याला एक कोंबडी बक्षीस”

मुंबई | सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतील प्रचार प्रमुख व शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर हल्ला झाला. संतोष परब हल्ला प्रकरणानंतर भाजप आमदार नितेश राणे चांगलेच अडचणीत आले आहेत.

या प्रकरणात न्यायालयाने नितेश राणेंची अंतरिम जामीनाची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार अजूनही कायम आहे.

न्यायालयाने नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी कोकणात मोठा जल्लोष साजरा केला. तर आम्ही जामिनासाठी उच्च न्यायालयात जाणार, अशी माहिती नितेश राणेंच्या वकिलांनी दिली.

नितेश राणे सध्या कुठे आहेत, याचा पत्ता अजून कोणालाच लागला नाही. पोलीस नितेश राणेंचा शोध घेत असताना गिरगावात भाजप कार्यालयाच्या शेजारी नितेश राणेंचं बॅनर लावण्यात आलं आहे.

या बॅनरवर हरवला आहे, अशी माहिती लिहीली आहे व सोबतच नितेश राणेंचा फोटो लावला आहे. तर नितेश राणे यांना शोधून काढणाऱ्या व्यक्तीस एक कोंबडी बक्षीस मिळेल असंही लिहिण्यात आलं आहे.

भाजप कार्यालयाशेजारी हे बॅनर कुणी लावलं याची माहिती अद्याप समोर आली नाही. पण हे बॅनर लावत कोणीतरी नितेश राणे व राणे कुटुंबीयांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

या बॅनरमुळे तळकोकणातील शिवसेना विरूद्ध राणे असा जुना वाद आता मुंबईत पेटण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे.

गिरगावात लावलेल्या या बॅनरवर नितेश राणेंचा फोटो देत हरवला आहे असं लिहिण्यात आलं आहे. तर शोधून देणाऱ्याला एक कोंबडी बक्षिस दिली जाईल असंही लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे यातून नवा वाद पेटण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, नितेश राणे अजूनही अज्ञातवासात आहेत. त्यामुळे नितेश राणे पोलीसांसमोर स्वत: हजर होणार की पोलीस नितेश राणेंना अटक करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू

टेन्शन वाढलं! राज्यातील ‘या’ पाच बड्या नेत्यांना कोरोनाची लागण

‘जवा बघतीस तू माझ्याकडं’ गाण्यावर आमदाराने धरला ठेका; पाहा व्हिडीओ

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता; पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

जळगावात शिवसेना-राष्ट्रवादी आमने सामने; गुलाबराव पाटलांचं खडसेंना प्रत्युत्तर