WhatsApp वापरणाऱ्यांना मोठा झटका; पुढील महिन्यापासून ‘या’ फोनमध्ये नाही चालणार WhatsApp

नवी दिल्ली | व्हॉट्स WhatsApp वापरणाऱ्यांना आता व्हॉट्स कंपनीने मोठा दणका दिला आहे. कारण पुढील महिन्यापासून त्यांनी त्यांच्या पॉलिसीमध्ये बदल केला असून आता काही कंपन्यांच्या फोनमध्ये व्हॉट्स चालणार नाही.

बरेच लोक म्हणजे अगदी कोटींच्या घरात व्हॉट्स वापरणारे लोक आहेत. त्यामुळे त्यांना आता मोठा तोटा होणार आहे. त्याचबरोबर काही कंपन्यांचे पूर्ण काम सुद्धा व्हॉट्सवर चालत असल्याने त्यांना सुद्धा त्रास होणार आहे.

व्हॉट्सच्या (New Policy of WhatsApp) नवीन पॉलिसीनूसार व्हॉट्स काही कंपन्यांच्या फोनमध्ये चालणार नाही आहे. त्यामुळे आता व्हॉट्स वापरायचे असेल तर वापरकर्त्यांना नवीन मोबाईल घेणे क्रमप्राप्त आहे.

नवीन नियमानुसार व्हॉट्स काही आयफोनवर काम करणार नाही. IOS 10 आणि IOS 11 या आयफोनवर व्हॉट्स 24 ऑक्टोंबर 2022 पासून काम करणार नाही.

त्यामुळे आता आगामी काळात कोणत्या आयफोनवर व्हॉट्स काम करते आणि कोणत्या फोनवर व्हॉट्सवर काम करत नाही, ते पाहावे लागणार आहे. आणि त्यानुसार आयफोन वापरकर्त्यांना आपला फोन बदलावा लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

Electric Vehicles घेत असाल तर थोडं थांबा, लवकरच येत आहेत या दमदार गाड्या; वाचा सविस्तर

“मुख्यमंत्र्यांना एकही गोष्ट माहित नाही, त्यांना पत्रकारांनी ट्रान्सहार्बरबद्दल प्रश्न विचारला आणि…” – आदित्य ठाकरेंची मोठी टीका

शिंदे समर्थक आमदाराची काँग्रेस शिवसेनेवर टीका करताना जीभ घसरली; विरोधकांची तुलना केली थेट…

“… तर नोटांवर देखील मोदींचे फोटो छापले असते” अहमदाबादमधील कॉलेजला मोदींच्या नावावरुन वाद

“मी श्रीमती केजरीवाल यांना हात जोडून सांगतो की…”; भाजप खासदारांची केजरीवालांच्या पत्नीला विनंती