दसरा मेळाव्याला ‘शिवजी पार्क’ सुने सुने राहणार!

मुंबई | शिवसेनेचा सालाबादप्रमाणे शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा (Dashera Melawa) होणार होता. त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम महानगरपालिकेला पत्र दिले होते. त्यानंतर त्यांच्यातून फुटून गेलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाने देखील तेथेच दसरा मेळावा घेणार असल्याचे जाहीर केले.

त्याकरीता एकनाथ शिंदे यांच्या गटाने देखील दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर घेण्यात यावा, म्हणून पालिकेला पत्र दिले आहे. पालिकेजवळ आता मोठा पेच निर्माण झाला आहे.

त्यामुळे दोनही अर्ज अद्याप पालिकेच्या विचाराधीन आहेत. येत्या काळात पालिका कोणा एकाला परवानगी देण्याची शक्यता होती. पण पालिका कोणालाही नाराज न करता मध्यम मार्ग काढण्याच्या तयारीत आहे.

राज्यातील आणि मुंबईतील एकंदरीत परिस्थिती आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता, यंदा शिवाजी पार्कात दसरा मेळावा आयोजित करण्याची परवानगी दोनही गटांना मिळणार नाही, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

त्यामुळे यंदा शिवाजी पार्क मैदान सुने सुने राहण्याची चिन्हे दिसत आहेत. गेली कित्येक वर्षे दसरा, शिवाजी पार्क आणि शिवसेना या गोष्टी हातात हात घालून होत्या. पण एकनाथ शिंदे यांनी ही परंपरा खंडीत केली आहे.

शिवाजी पार्क मैदान मिळविण्यासाठी दोनही बाजुंनी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. ही बाब जी – उत्तर (G North) विभागाच्या लक्षात आली असून त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या विधी खात्याकडून अभिप्राय मागविला आहे.

काही दिवसांपूर्वी प्रभादेवी परिसरात बंडखोर आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी गोळीबार केला होता. त्यांच्याविरोधात दादर पोलीस स्थानकात (Dadar Police Station) गुन्हा दाखल झाला असून, त्याचा परिणाम सभेच्या परवानगीवर होणार आहे.

महत्वाच्या बातम्या – 

WhatsApp वापरणाऱ्यांना मोठा झटका; पुढील महिन्यापासून ‘या’ फोनमध्ये नाही चालणार WhatsApp

Electric Vehicles घेत असाल तर थोडं थांबा, लवकरच येत आहेत या दमदार गाड्या; वाचा सविस्तर

“मुख्यमंत्र्यांना एकही गोष्ट माहित नाही, त्यांना पत्रकारांनी ट्रान्सहार्बरबद्दल प्रश्न विचारला आणि…” – आदित्य ठाकरेंची मोठी टीका

शिंदे समर्थक आमदाराची काँग्रेस शिवसेनेवर टीका करताना जीभ घसरली; विरोधकांची तुलना केली थेट…

“… तर नोटांवर देखील मोदींचे फोटो छापले असते” अहमदाबादमधील कॉलेजला मोदींच्या नावावरुन वाद