संजय राऊत यांच्याबाबात मोठी खळबळजनक माहिती समोर; बेहिशेबी रक्कम त्यांनी चित्रपट आणि मद्य…

मुंबई | गोरेगाव पत्राचाळ भूखंड गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात आता मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे.

संजय राऊत सध्या आर्थर रोड तरुंगात न्यायालयीन कोठडी कंठत आहेत. त्यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाने (ED) कारवाई केली आहे. त्यांना 3 ऑक्टोंबर पर्यंत कोठडीत रहावे लागणार आहे.

संजय राऊत यांना पत्राचाळ भूखंडात बेहिशेबी मालमत्ता आणि पैसा मिळाला आहे. तो त्यांनी त्यांच्या अनेक नातेवाईकांच्या आणि आप्तांच्या बँक खात्यावर टाकल्याचा आरोप आहे.

स्वप्ना पाटकर (Swapna Patkar) यांचा यासंबधी ईडीने जवाब नोंदवून घेतला आहे. त्यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. त्यामुळे आता संजय राऊत पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले होते.

संजय राऊत यांनी बेहिशेबी रक्कम चित्रपट आणि मद्य कंपन्यांत गुंतवली आहे, असा खुलासा स्वप्ना पाटकर यांनी केला. त्यामुळे संचलनालय याचा तपास आणखी वेगाने करत आहे.

राऊतांनी अनेक मोठ्या रकमा त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्या नावाने स्थापन केलेल्या बनावट कंपन्यांमध्ये वळवल्याची माहिती राऊतांच्या माजी सहकारी आणि पत्राचाळ घोटाळ्यातील प्रमुख साक्षिदार स्वप्ना पाटकर यांनी दिली होती.

संजय राऊतांनी राऊटर्स एलएलपी कंपनी (Routers LLP Company) स्थापन केली आणि याच कंपनीने ‘ठाकरे’ (Thackeray Movie) चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यांनी 2021 साली एक मद्य कंपनी विकत घेतली होती, अशा जवाब पाटकर यांनी ईडीला दिला.

महत्वाच्या बातम्या – 

‘विनोदाचे बादशहा राजू श्रीवास्तव कालवश’

“रामदास कदमांनी महाराष्ट्रात कुठेही फिरावे, त्यांच्या…” शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचे थेट आव्हान

शरद पवारांची पत्राचाळ घोटाळ्यात चौकशी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

पत्राचाळ घोटाळ्याचे धागेदोरे शरद पवारांपर्यंत? भातखळकरांची चौकशीची मागणी

रामदास कदमांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “कोणी दाढी…”