‘राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रकाश आंबेडकरांचे गंभीर आरोप’

मुंबई | वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शिवसेना आणि काँग्रेस यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर देखील निशाणा साधला.

आम्ही काँग्रेस (Congress /INC) आणि शिवसेनेसोबत (Shivsena) आघाडी करण्यासाठी तयार आहोत आणि त्या स्वरुपाचा प्रस्ताव देखील आम्ही त्यांनी पाठविला होता. पण अद्याप त्यांच्याकडून त्यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, असे आंबेडकर म्हणाले.

तसेच महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा विडा राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) उचलला होता. असा मोठा आरोप यावेळी प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केला आहे.

देशाची वाटचाल राजेशाही आणि हुकूमशाहीच्या दिशेने सुरु आहे, असे आंबेडकर म्हणाले. तसेच त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपवर देखील तोंडसूख घेतले.

पंडीत नेहरुंनी (Pandit Nehru) कबुतरे सोडली होती, मात्र ती त्यांनी स्वत:च्या वाढदिवसादिवशी सोडली नव्हती. मोदींना वाढदिसादिवशी चित्ते सोडले असून त्यांची एकप्रकारे दहशत पसरविली जात आहे, असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.

यावेळी त्यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या ‘भारत जोडो’ (Bharat Jodo) यात्रेवर देखील टीका केली. भारत तुटला कुठे आहे, त्याला जोडायला? देश कुठे चालला आहे आणि राहुल गांधी यांचे आंदोलन कुठे चालले आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

अश्याप्रकारे सांगली येथे प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधताना प्रकाश आंबेडकरांना एकंदरीत भारताच्या आणि सर्व पक्षांच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.

महत्वाच्या बातम्या – 

संजय राऊत यांच्याबाबात मोठी खळबळजनक माहिती समोर; बेहिशेबी रक्कम त्यांनी चित्रपट आणि मद्य…

‘विनोदाचे बादशहा राजू श्रीवास्तव कालवश’

शरद पवारांची पत्राचाळ घोटाळ्यात चौकशी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

“रामदास कदमांनी महाराष्ट्रात कुठेही फिरावे, त्यांच्या…” शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचे थेट आव्हान

पत्राचाळ घोटाळ्याचे धागेदोरे शरद पवारांपर्यंत? भातखळकरांची चौकशीची मागणी