मुंबई | राज्यात महाविकास आघाडी सरकार (MVA) कोसळले आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप यांचे सरकार सत्तेत आले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.
ऑगस्ट क्रांतीदिनी (09 ऑगस्ट) शिंदे आणि भाजप सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यानंतर शिंदे यांच्या गोटातील नऊ आणि भाजपच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली. यावेळी भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना देखील मंंत्रिपद मिळाले.
भाजपच्या एक व्यक्ती एक पद नियमाप्रमाणे आता चंद्रकांत पाटील मंत्री झाल्याने प्रदेशाध्यक्ष पद रिक्त झाले होते. त्यामुळे आता प्रदेशाध्यक्षपदी नवीन नेत्याची निवड करणे क्रमप्राप्त होते.
त्याप्रमाणे भाजपचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष (Maharashtra State President) म्हणून नेमण्यात आले. तर मुंबईची जबाबदारी आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या खांद्यावर टाकण्यात आली.
आज भाजपने या नवीन कार्यकारणीची घोषणा केली. आशिष शेलार हे यापूर्वी देखील मुंबईचे प्रदेशाध्यक्ष होते. आगामी महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation Election 2022) निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन शेलारांची या पदी वर्णी लागली आहे.
एका ओबीसी आणि विदर्भाच्या नेत्याला हे पद मिळाले आहे. यामागे भाजपचे राजकारण आहे, असे सध्या म्हंटले जात आहे. बावनकुळे यांना यापूर्वी भाजपकडून विधानसभेचे तिकीट नाकारले होते.
बावनकुळे यांना तिकीट नाकारल्याने विधान परिषदेवर घेतले होते. शेलारांनी मुंबई महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत मोठी कामगिरी केली होती. म्हणून त्यांना हे पद यावेळी देखील देण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या –
‘अरे वा! मग शिवसेना माझीच’, उदयनराजेंचं मोठं वक्तव्य
“बंडाच्यावेळी शहिद झालो असतो”; मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट
दीपक केसरकरांचा बंडाबाबत खळबळजनक दावा, म्हणाले…
‘भाजपमध्ये आता फक्त फडणवीस एकटेच…’; भास्कर जाधवांची फडणवीसांवर टीका
‘बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान’