अखेर निर्भयाला न्याय मिळणार!; 20 मार्च रोजी पहाटे साडे पाच वाजता नराधमांना दिली जाणार फाशी

दिल्ली|  दिल्लीतील निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चार दोषींना आता 20 मार्च रोजी पहाटे साडे पाच वाजता फाशी दिली जाणार आहे. या प्रकरणातील पवन गुप्ताची राष्ट्रपतींकडील दया याचिका फेटाळण्यात आल्यानंतर दिल्लीच्या कोर्टाने दोषींच्या नावाने पुन्हा नवे डेथ वॉरंट जारी केले आहे. या आधीची तीन डेथ वॉरंट आयत्यावेळी रद्द करण्याची वेळ आली होती त्यामुळे चौथ्यांदा हे वॉरंट जारी करण्यात आले आहे.

हे आरोपी तिहार कारागृहात असल्याने तिहार कारागृहाच्या प्रशासनाने दिल्लीच्या कोर्टात बुधवारी डेथ वॉरंट जारी करावे अशी मागणी करणारा अर्ज दाखल केला होता त्यानुसार आज हे डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे.

आता दोषींकडे बचावाचा कोणताही मार्ग उरलेला नाहीं त्यामुळे त्यांना त्या दिवशी फासावर जावेच लागेल असे मत निर्भयाच्या वडिलांनी व्यक्त केले आहे.

या दोषींना आधी 22 जानेवारील फाशी होंणार होती पण त्यांच्या अर्जामुळे ती वेळ टळली, त्यानंतर 1 फेब्रुवारी आणि 3 मार्च अशा तीन तारखा त्यांच्या फाशीसाठी जाहीर झाल्या होत्या पण त्यातही दोषींनी केलेल्या वेगवेगळ्या दया अर्जामुळे तसेच दया अर्ज फेटाळण्यात आल्याने त्यांनी त्याला दिलेल्या आव्हान याचिकांमुळे ही फाशी टळली होती. आता जवळपास सारीच प्रक्रिया पुर्ण झाल्याने दोषींना त्या दिवशी होणारी फाशी टळणार नाही असा विश्‍वास निर्भयाच्या वडिलांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-…नाहीतर जनता तुम्हाला मिटवून टाकेल- देवेंद्र फडणवीस

-ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प अजित पवार सादर करणार

-सावधान… आणखी एका बँकेवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध; काढता येणार फक्त 50 हजार रूपये!

-13 लाख 85 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले 9 हजार कोटी रूपये; अजित पवारांची माहिती

-औरंगाबादच्या विमानतळाचं नामांतर म्हणजे पराक्रमी महाराजांना दिलेली मानवंदना- जयंत पाटील