कोरोना वाढतोय! ‘या’ तारखेपर्यंत पुण्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद

पुणे | राज्यासह देशाला कोरोना माहामारीचा गेल्या दीड वर्षांपासून सामना करावा लागत आहे. अनेक संकटांना तोंड देत कोरोनाविरूद्धचा लढ सर्वजण लढत आहेत. अशात सध्या कोरोनाच्या रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी देशभरातील कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आली होती. पण अचानक कोरोनाच्या ओमिक्राॅन या नव्या व्हेरियंटनं सर्वत्र धुमाकुळ घालायला सुरूवात केल्यानं आता अधिक चिंता वाढली आहे.

कोरोना रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत असताना प्रशासन आता लसीकरणाच्या वेग वाढवण्यासोबतच अनेक क्षेत्रांवर निर्बंध लावण्याचा विचार करत आहे. या दृष्टीनं सध्या प्रशासन पावलं टाकत आहे.

मुंबईमध्ये काही दिवसांपासून दररोज विक्रमी रूग्णसंख्या आढळत आहे. परिणामी मुंबईसारख्या शहरात अनेक गोष्टींवर निर्बंध लावले जाणार आहेत. मुंबईतील शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

राज्यातील प्रमुख शहर असणाऱ्या पुण्यातील पहिली ते आठवीच्या शाळा 30 जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आणि पुण्याचे माहपौर मुरलीधर मोहोळ यांनी हा निर्णय घेतला आहे.

पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा पुढील निर्णय येईपर्यंत बंद असणार आहेत. सध्या कोरोनाच्या आकडेवारीत लक्षणीय वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र शाळांबाबत निर्णय घेतला जात आहे.

पुणे शहरात काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात रूग्णसंख्या वाढली आहे. रूग्ण गेल्या दोन दिवसांमध्ये चौपट झाल्याची माहिती मिळत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान, पुणे शहरातील रूग्णसंख्या जर वाढत राहीली तर आणखीन कडक निर्बंध लावण्यावर आम्ही विचार करत आसल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

 पोलिसांची मुजोरी! प्रवाशाला लाथा मारत बेदम मारहाण, पाहा व्हिडीओ

 पुणे जिल्हा बॅंकेवर अजित पवारांचं वर्चस्व; विजयानंतर म्हणाले, “मला डाऊट होताच तिथं…”

 पंतप्रधान नरेंद्र मोदींना काळे झेंडे दाखवणाऱ्या महिलेसोबत घडला अत्यंत धक्कादायक प्रकार!

आयुक्त चहल आणि सनदी अधिकारी विश्वासात घेत नाहीत- किशोरी पेडणेकर

मोठी बातमी! नितेश राणेंना दिलासा, तूर्तास अटक नाही