पुणेकरांनो काळजी घ्या! गेल्या 24 तासातील चिंताजनक आकडेवारी समोर

पुणे | कोरोनाच्या (Pune Corona) दोन्ही लाटेत सर्वांचंच मोठं नुकसान झालं होतं. अशातच आता राज्यात कोरोनाची तिसरी लाट (Third Wave) आता आली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे.

मागील दोन दिवसात कोरोना रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नवीन कोरोनाबाधित रूग्ण दुप्पटीने वाढल्याचं चित्र आहे. अशातच आता ओमिक्राॅन व्हेरियंटने पुण्याचं टेन्शन वाढवलं आहे.

पुण्यात आज दिवसभरात 1,104 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 151 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

राज्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा जवळपास 18 टक्क्यांवर गेल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणांचीही चिंता वाढली आहे.

मागील आठवडाभरात सक्रीय रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यात 80 टक्क्यांपर्यंत रुग्ण हे लशीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. मात्र, तरीही काळजी घेण्याची गरज आहे.

मास्क न घातल्यास 500 रुपये दंड आणि मास्क नसताना सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1000 रुपये दंड आकारण्याचा निर्णय आज पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीत घेण्यात आला असून 5 जानेवारी 2022 पासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

दरम्यान,आठवडाभरात पुण्यात वाढलेली कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या प्रत्यक्ष सुरु असलेल्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या –

कोरोना वाढतोय! ‘या’ तारखेपर्यंत पुण्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद

 पोलिसांची मुजोरी! प्रवाशाला लाथा मारत बेदम मारहाण, पाहा व्हिडीओ

 पुणे जिल्हा बॅंकेवर अजित पवारांचं वर्चस्व; विजयानंतर म्हणाले, “मला डाऊट होताच तिथं…”

 पंतप्रधान नरेंद्र मोदींना काळे झेंडे दाखवणाऱ्या महिलेसोबत घडला अत्यंत धक्कादायक प्रकार!

आयुक्त चहल आणि सनदी अधिकारी विश्वासात घेत नाहीत- किशोरी पेडणेकर