Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी उद्यावर, जाणून घ्या आज न्यायालयात काय घडले?

Supreme Court of India
Photo Credit: Twitter / @Eknath Shinde, Uddhav Thackeray, Mahima Pandey

मुंबई | शिवसेना आणि शिंदे गटातील वाद न्यायालयाच्या दरबारात आहेत. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of India) आज त्यावर दोनही पक्षांचे युक्तीवाद ऐकून घेतले आहेत. अनेक खटल्यावर सध्या न्यायालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) विरुद्ध शिवसेना (Shivsena) असा वाद सुरु आहे.

आजचे कामकाज न्यायालयाने पूर्ण केले असून उर्वरीत युक्तीवाद उद्या होणार आहे. आजच्या तारखेला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibbal) आणि शिंदे गटाचे वकील हरीश साळवे (Harish Salave) यांच्यात मोठी खडाजंगी पाहायला मिळाली.

उद्धव ठाकरे यांच्या वकीलाकडून शिंदे गटाने दुसऱ्या पक्षात विलीन होण्याचा प्रस्ताव वारंवार मांडण्यात आला. तर शिंदे गटाच्या वकीलांनी तो फेटाळत आपला गटच खरी शिवसेना असून आम्ही अजून पक्ष सोडला नसल्याचे म्हटले आहे.

यावेळी न्यायालयाने शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांना त्यांचा युक्तीवाद लेखी तयार करुन तो उद्या (दि. 04) रोजी नव्याने न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले. सरन्यायाधीश एन. व्हि. रमणा (N. V. Ramana), न्यायमूर्ती कृष्ण मुरारी (Krushna Murari) आणि न्यायमूर्ती हिमा कोहली (Hima Kohali) या तीन सदस्यीय पीठापुढे सुनावणी पार पाडली.

शिंदे सरकारच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या, विधानसभा अध्यक्षांच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका आणि शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी विधानभा उपाध्यक्षांनी दिलेल्या नोटीसा, या सर्व खटल्यांची एकत्रित सुनावणी यावेळी सर्वोच्च न्यायालयात पार पडली.

यावेळी शिंदे गटाने आपल्या गटातील 16 आमदारांच्या कारवाईवर आक्षेप घेत ते अधिकार विधनासभा अध्यक्षांना देण्याचे सांगितले, तेव्हा न्यायालयाने त्यांना सुनावले. तसेच काही प्रकरणे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे देण्याची मागणी देखील शिंदे गटाने केली होती.

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) मूळ शिवसेना कोणाची हे सिद्ध करण्यासाठी पुरावे सादर करण्याचे आदेश शिवसेनेला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. त्यांना हे पुरावे सादर करण्यासाठी 8 ऑगस्ट पर्यंत वेळ दिली आहे.

आम्ही शिवसेना सोडली नाही, तसेच 40 आमदारांच्या गटाला 15 आमदारांचा गट अपात्र ठरवू शकत नाही, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला. परंतु शिवसेनेकडून त्यांच्या हालचाली आणि कामे त्यांनी पक्ष सोडल्याचे सिद्ध करत आहेत, असा युक्तीवाद केला गेला.

महत्वाच्या बातम्या – 

‘भाऊ पंतप्रधान तर मी उपाशी मरायचं का?’, पंतप्रधान मोदींच्या भावाचेच मोदी सरकारविरोधात आंदोलन

हल्ल्यानंतर उदय सामंत आक्रमक, ट्विट करत म्हणाले….

उदय सामंतांच्या गाडीवर हल्ला, नवा वाद पेटणार?

“कोरोना लसीकरण मोहीम संपल्यावर लगेच CAA लागू करणार…”

अजित पवारांनी उडवली शिंदे सरकारची खिल्ली, म्हणाले…