“कोरोना रोखण्यासाठी नाईट कर्फ्यूचा काही उपयोग नाही”

नवी दिल्ली | महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये कोरोना रोखण्यासाठी नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. हा उपाय कोरोना रोखण्यासाठी प्रभावी ठरू शकणार नाही, असं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. त्यातच जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन (Soumya Smaaminathan) यांनी म्हटलं आहे.

सौम्या स्मामीनाथन यांनी केंद्र सरकारला काही सल्ले देखील दिले आहेत. डॉ. स्वामीनाथन यांनी भारतासारख्या मोठी रुग्णसंख्या असलेल्या कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करायला हव्यात याविषयी भाष्य केलं आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नाईट कर्फ्यूचा काही उपयोग नसल्याचं सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलं आहे. तसेच नाईट कर्फ्यू लावण्यामागे कुठलाही वैज्ञानिक आधार नसल्याचं स्वामीनाथन म्हणाल्या आहेत.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नाईट कर्फ्यू लावण्यामागे कोणताही वैज्ञानिक आधार नाही. भारतासारख्या देशांनी या विषाणूला आवर घालण्यासाठी वैज्ञानिक  आधारांवर धोरण ठरवायला हवं, असं डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलं आहे.

कोविड संसर्ग रोखण्यासाठी विज्ञानावर आधारित आणि पुराव्यांवर आधारित आवश्यक उपाययोजना आवश्यक आहेत. अशा प्रकारच्या उपाययोजनांची एक यादीच करता येईल, असंही डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितलं आहे.

तसेच स्वामीनाथन यांनी भारतातील ओमिक्रॉन (Omicron) रूग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. भारतामध्ये ओमिक्रॉन रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

मला वाटत ही फक्त सुरूवात आहे. फक्त काही शहरांमध्येचं ओमिक्रॉन बाधित रूग्ण सापडत आहेत. पुढे  लोकसंख्येच्या भागाला ओमिक्रॉनची बाधा होण्याची शक्यता असल्याची भीती डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी व्यक्त केली आहे.

देशात होणारे सार्वजानिक कार्यक्रमांमुळे भारतात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे. जाहीर कार्यक्रमांमुळे आणि मनोरंजनाच्या ठिकाणी विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत असल्याचही, डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलं आहे. मात्र, यावेळी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहायला हवं, असं स्वामीनाथन सांगतात.

महत्त्वाच्या बातम्या-

“नवीन वर्षात महाविकास आघाडी सरकार घालवण्याचा संकल्प केलाय”

WHOच्या मुख्य वैज्ञानिकांनी भारताला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला, म्हणाले…

“देशात कोरोनाची तिसरी लाट भाजपमुळेच आली”

“चार दिवसात कोकणात काय काय घडलं अमित शहांना सर्व सांगणार”

‘… तर 2022 मध्ये कोरोना संपणार’; WHO प्रमुखांनी दिली दिलासादायक माहिती