मित्रच ठरले यमदूत!, नांदेडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना

नांदेड | 31 डिसेंबर म्हणजे नवीन वर्षाच्या स्वागताची शेवटची रात्र, या रात्री मौजमजा करण्याकडे तसेच पार्ट्या करण्याकडे अनेकांचा कल असतो. मित्रांसोबत मज्जा करणं हा उद्देश असताना देखील अशा पार्ट्यांमध्ये काही अनुचित प्रकार घडलेले पहायला मिळतात. शक्यतो दारुच्या आहारी गेल्यानं असे प्रकार झाल्याचं पहायला मिळतं. नांदेडमध्ये देखील असाच एक प्रकार घडला आहे ज्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

नांदेडमध्ये एका युवकाला चक्क आपला जीव गमवावा लागला आहे. धक्कादायक बाब अशी की त्याचे मित्रच त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरले आहेत. एकूणच घडलेली घटना धक्कादायक असून नांदेडमध्ये सध्या या घटनेची चांगलीच चर्चा आहे. अनेकांनी ही घटना काळजाचा थरकाप उडवणारी असल्याचं म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं?

संतोष हळदेकर असं या घटनेत मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे. पार्टी करण्यासाठी मित्रांसोबत तो एका इमारतीच्या छतावर जमला बोता. यावेळी मित्रांसोबत त्याचा काही वाद झाला. या वादाचं रुपांतर मोठ्या भांडणात झालं आणि जे घडायला नको होतं तेच घडलं.

नांदेड शहरातील मालेगांव रोडवरील गजानन मंदिराजवळची ही घटना काळजाचा थरकाप उडवणारी आहे, कारण संतोष हळदेकर हा तरुण मित्रांसोबत बिल्डिंगच्या छतावर पार्टी करत बसला होता, यावेळी वादावादीतून चार आरोपींनी संतोषला मारहाण करत छतावरून खाली फेकलं. दुर्दैवाची बाब म्हणजे या घटनेत संतोषचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांना ही घटना कळताच त्यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतलीय. भाग्यनगर पोलिसांनी याप्रकरणी घटनास्थळी धाव घेतली व या घटनेप्रकरणी चौकशी केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत चार आरोपीना ताब्यात घेतलंय.

नवर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना उघडकीस आली, त्यामुळे नांदेडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. 31 डिसेंबरची रात्र संतोषसाठी काळरात्र ठरली. दारुच्या नशेत झालेल्या भांडणात मित्रांनीच त्याचा घात केला. रागाच्या भरात झालेला हा प्रकार थेट त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे.

नांदेडमध्ये घटनेची मोठी चर्चा-

नववर्ष म्हणजे जल्लोष करण्याचा दिवस मात्र याच दिवशी अशा प्रकारची घटना घडली. शहरात ही घटना वाऱ्याच्या वेगाने पसरली. संतोषच्या कुटुंबियांना या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. या घटनेवर विश्वास ठेवता येणार नाही अशी ही घटना आहे.

मित्रांनी का केला घात?

कोणताही गुन्हा घडल्यानंतर पोलीस पहिल्यांदा त्या गुन्ह्यातील आरोपींना पकडतात, त्यानंतर त्या मागील कारणांची तपासणी करतात. या घटनेमध्ये पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून कारण जाणून घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.

सध्या तरी दारु पिऊन झालेल्या भांडणातून हा प्रकार झाल्याचं समोर येत आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत, एवढंच कारण आहे की यापेक्षा दुसरं काही कारण आहे याकडे पोलिसांच्या तपासाची चक्रं सुरु आहेत. येत्या काळात या घटनेबद्दल अधिक खुलासा होऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “लॉकडाऊनचे चटके लोकांनी भोगलेत, मात्र…”; मोठा निर्णय होण्याची शक्यता

 नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट

WHOच्या मुख्य वैज्ञानिकांनी भारताला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला, म्हणाले…

“देशात कोरोनाची तिसरी लाट भाजपमुळेच आली”

“चार दिवसात कोकणात काय काय घडलं अमित शहांना सर्व सांगणार”