‘उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा नाटक’; निलेश राणेंची बोचरी टीका

मुबंई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर गेले होते. त्यांच्या या दौऱ्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं  आहे. उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा हे नाटक आहे, अशी बोचरी टीका निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

मुख्यमंत्री सांगतात आम्हाला रामाने भरभरुन दिलं आहे. तर त्यांनी राम मंदिरासाठी किमान 500 कोटी तरी द्यावेत. रामाला तुम्ही नेहमी मागत राहीलात पण आता त्या रामाला काहीतरी द्या, असं निलेश राणे म्हणाले.

राजकारण करत नाही म्हणतात पण त्यांचा अयोध्या दौरा हा राजकारणाचाच भाग आहे, असं म्हणत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून त्यांच्यावर टीका केली आहे. शिवसेनेला रामाचं नातं दाखवावं लागतं मात्र आमची छाती फाडली तरी त्यात प्रभू श्रीरामच दिसतील, असा टोला पाटलांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

मुख्यमंत्री होईन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं-उद्धव ठाकरे

मी भाजपला सोडलंय… हिंदुत्वाला नाही- उद्धव ठाकरे

-शिवसेनेच्या वतीने राम मंदिरासाठी 1 कोटी रूपये देणार- उद्धव ठाकरे

-आमची छाती जरी फाडली तरी रामच दिसेल- चंद्रकांत पाटील

-राज्यसभेसाठी काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्यांमध्ये उमेदवारीसाठी चुरस