सिंधुदुर्गात नारायण राणेंचा सेनेला ‘दे धक्का’; सतीश सावंत पराभूत

सिंधुदुर्ग | सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेत सत्ता मिळवण्यासाठी यंदा चुरसीची लढत पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर सत्ता कोण स्थापन करणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं असताना भाजपने कणकवलीत आपलं वर्चस्व स्थापन केलं आहे. कणकवलीतून विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचा पराभव झाला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या गटाने महाविकास आघाडीला मोठा झटका देत आपलं वर्चस्व स्थापन केलं आहे. या निवडणुकीत राणेंची प्रतिष्ठा पनाला लागली होती.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मतमोजणीचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. सध्या भाजप 7 आणि महाविकास आघाडी 5 अशी तुरशीची लढत पाहायला मिळत आहे.

जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली येथून सर्वात धक्कादायक निकाल लागला. कणकवलीत माजी बँक जिल्हाध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाल्याने सेनेला मोठा धक्का बसला आहे.

सतीश सावंत विरूद्ध विठ्ठल देसाई अशी लढत कणकवलीत रंगली होती. विद्ममान अध्यक्ष सतीश सावंत यांचा पराभव शिवसेनेसह महाविकास आघाडीसाठी देखील मोठा धक्का मानला जात आहे.

या निवडणुकीत सतीश सावंत आणि विठ्ठल देसाई या दोघांनाही सम समान मतं पडली होती. त्यामुळे चिठ्ठी टाकून याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत एकुण 19 जाणा आहेत. बँकेवर सत्ता आणायची असेल तर किमान 10 जागांवर विजय मिळवणं गरजेचं आहे.

भाजपकडे सध्या 7 जागा असून आणखी 3 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे भाजप सध्या जिल्हा बँक ताब्यात घेण्याच्या दृष्टीने पाऊलं टाकत आहे.

महत्वाच्या बातम्या-

ऐकावं ते नवलंच! कुत्र्याला जेवण दिलं नाही म्हणून वेटर सोबत केलं धक्कादायक कृत्य

तुम्ही पण प्लास्टिकच्या डब्ब्यातून जेवण जेवता का?, मग ही बातमी एकदा वाचाच

‘भाषेऐवजी भावना आणि शब्दांऐवजी संवेदना समजून घ्या’, ‘त्या’ पत्रावरून रोहित पवारांची MPSCला विनंती

“नितेश राणे हरवला आहे, शोधणाऱ्याला एक कोंबडी बक्षीस”

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू