…म्हणून अर्थमंत्री सीतारामन यांनी पूर्ण अर्थसंकल्प वाचला नाही!

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मांडला. मात्र, तब्येत बिघडल्यामुळे निर्मला सीतारामन यांना पूर्ण अर्थसंकल्प वाचताच आला नाही. अर्थसंकल्प वाचत असतानाच त्यांचा रक्तदाब वाढला होता. पीटीआयने हे वृत्त दिलं आहे.

अर्थसंकल्प वाचत असतानाच सीतारामन यांची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना बसण्यास सांगण्यात आले. सीतारमन यांनी केलेल्या भाषण त्यांनी यापूर्वी केलेल्या भाषणापेक्षा मोठं होते. मात्र, तब्येत बिघडल्यामुळे त्यांना भाषण मध्यंतरी थांबवावे लागले.

गेल्या वर्षी सीतारामन यांनी 2 तास, 17 मिनिटांचं अर्थसंकल्पीय भाषण केलं होतं. यावेळी त्यांनी आपलं भाषण 2 तास 41 मिनिटांनी थांबवलं. त्यामुळे यापूर्वीचा त्यांचा भाषणाचा विक्रम त्यांनी स्वत:च मोडला आहे.

दरम्यान, सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या धोरणावर आमचं सरकार पुढे जात आहे. भारत आज जगातील विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये आघाडीवर आहे. महागाईवर नियंत्रण ठेवण्यात केंद्र सरकारला यश आल्याचं सीतारामन यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या- 

-मोदी सरकार मुलींच्या लग्नाचं वय बदलणार???

-केंद्र सरकारची पुन्हा राजधानीकरांना सावत्रपणाची वागणूक; अर्थसंकल्पावर केजरीवाल भडकले

-येत्या संपूर्ण दशकाची दिशा ठरवणारा अर्थसंकल्प- देवेंद्र फडणवीस

-महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरीसाठी संशोधन केंद्र उभारणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

-आदिवासींच्या गरीबीची चेष्टा करू नका; किरीट सोमय्यांना आव्हाडांनी दिलं सडेतोड उत्तर