मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. नितेश राणेंनी ट्विट करत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर बोचरी टीका केली आहे.
नितेश राणेंनी एका गाडीला माकडांनी वेढा घातल्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत काही माकडं गाडीचा दरवाजा उघडून चालकाच्या जागी, काही गाडीच्या वर बसलेली दिसत आहेत. तसेच नितेश राणेंनी फोटोवर कब्जा तो पूर्ण बहुमत से किया है! लेकीन चलाना एक को भी नहीं आता…, असं कॅप्शन देत सरकारवर निशाणा साधला आहे.
आगामी काळात सरकारचा घाम काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही नितेश राणेंनी शिवसेना. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला दिला आहे.
दरम्यान, नितेश राणे गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही.
???????????? pic.twitter.com/Gp1XHl5tYO
— nitesh rane (@NiteshNRane) November 30, 2019
महत्वाच्या बातम्या-
तेव्हा आम्ही तुमच्यासोबत आहोत; एमआयएमच्या सदस्यांचा ठाकरेंना शब्द – https://t.co/j2oeo3HOPZ @OfficeofUT
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 1, 2019
राहुल बजाज यांची अमित शहा यांच्यावर जोरदार टीका – https://t.co/HezsRzV1pW @Rahul_Bajaj @AmitShah
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 1, 2019
“शेतकरी पुत्र विधानसभेचा अध्यक्ष झाल्याचा आनंद”- https://t.co/Gko29dxWa9 @uddhavthackeray @NANA_PATOLE
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 1, 2019