महाराष्ट्र मुंबई

“महाराष्ट्रात माणसाच्या जिवाचं काहीही मूल्य राहिलं नाही”

मुंबई | भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुंबईतील एका रुग्णालयातील एका रुग्णाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात रुग्णानं हॉस्पिटलमधील स्थिती सांगितली आहे. हा व्हिडीओ शेअर करत नितेश राणे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात माणसांच्या जिवाचं काहीही मूल्य राहिलेलं नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

मुंबईतील परिस्थिती गंभीर असताना आमदार नितेश राणे यांनी एका रुग्णाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला हा रुग्ण नीट लक्ष दिलं जात नसल्याचं व्हिडीओमध्ये सांगत आहे.

शताब्दी हॉस्पिटल. महाराष्ट्रात जिवाचं काहीही मूल्य राहिलेलं नाही. 50 दिवस सरकारचं ऐकून घेतल्यानंतरही प्रत्येक दिवशी हे बघायला मिळत आहे. मग आपल्याला या सरकारची गरज काय?, असं म्हणत नितेश राणे यांनी सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, मुंबईतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच मुंबईतील स्थितीवर केंद्राचं विशेष लक्ष असून, केंद्रानं पथक नियुक्त केलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-लॉकडाउननंतर एकनाथ खडसे भाजपला धक्का देणार; घेणार मोठा निर्णय?

-मातृदिनी आमदार रोहित पवारांनी आईसाठी स्वत:च्या हातानं बनवला चहा

-केंद्राच्या असंवेदनशील अवस्थेमुळे स्थलांतरित मजुरांची दैन्यावस्था काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांची टीका

-…तर मी निवडणूक लढवणार नाही; उद्धव ठाकरेंचा बाळासाहेब थोरातांना मेसेज

-मटकाकिंग रतन खत्रीचं निधन