नितेश राणेंचा दणका?? ‘त्या’ रस्त्याच्या दुरूस्तीला अखेर सुरूवात!

सिंधुदुर्ग |  काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी ज्या रस्त्यासाठी प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केली होती… जो राडा घातला होता… त्या रस्त्याचं काम अखेर सुरू केलं आहे. त्यामुळे हा नितेश राणेंचा तर दणका नाही ना, अशी चर्चा आता दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

गेले काही दिवस हे प्रकरण चांगलंच तापलं होतं. संबंधित ठेकेदारच्या हे लक्षात आल्यावर त्याने रस्त्याच्या कामाला सुरूवात केली आहे.

नितेश राणे आणि त्य़ांच्या कार्यकर्त्यांनी गडनदीवरील पुलाला खड्डे पडल्याच्या कारणास्तव उप-अभियंते प्रकाश शेडेकर यांना चिखलाने अंघोळ घातली होती. यानंतर नितेश यांच्यावर पोलिसांनी कारवाई करत अटक केली होती. कोर्टाने देखील नितेश यांना दणका देत पहिल्यांदा पोलिस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

मात्र बुधवारी ओरोस न्यायालयाने नितेश यांच्यासह सर्व आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला. ओरोस न्यायालयाने सर्व आरोपींना 20 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

दरम्यान, नितेश राणे यांनी कुठल्याही परिस्थितीत रस्त्याचं काम पूर्ण करून घेणारच, असा निश्चय केला होता. त्यांच्या याच प्रयत्नांना आता यश आल्याचं बोललं जात आहे.