“नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका करू नये, तेवढी त्यांची उंची नाही”

जळगाव | शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत मनातील खदखद बोलून दाखवली. तसेच मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावरून आता भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी रामदास कदम आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला.

उद्धव ठाकरे हा व्यक्ती आयुष्यात कोणाचाच झालेला नाही, असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. नितेश राणे यांच्या या टीकेला आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय.

नितेश राणे यांनी शिवसेना पक्ष प्रमुखांबाबत बोलावे एवढी त्यांची उंची नसल्याचा घणाघात गुलाबराव पाटील यांनी केला आहे. ते जळगाव जिल्ह्यातील बोदवडमध्ये बोलत होते.

उद्धव ठाकरे यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांनीच नारायण राणे यांना राजकारणात आणले, राजकारणात मोठे केले. शिवसेनेमुळे ते मोठे झाले. त्यामुळे नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंबाबत बोलताना विचार करावा. नितेश राणे यांची उद्धव ठाकरेंबाबत बोलण्याएवढी उंची नसल्याचं गुलाबराव पाटील म्हणालेत.

रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला होता.

ज मी रामदास कदमांना सांगेन की, तुमची आज काय अवस्था झाली आहे. तुम्ही आज राजकारणामध्ये कुठेच नाहीत आणि राणे साहेब केंद्रात मंत्री आहेत. या फरकाचा रामदास कदमांनी विचार करावा, असं नितेेश राणे म्हणाले.

राणे साहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा याच रामदास कदमांना उद्धव ठाकरेंनी विरोधीपक्ष नेता बनवलं होतं. तेव्हा ते जिभेला हाड नसल्यासारखे आमच्यावर बोलायचे. आता कदमांसारख्या असंख्य शिवसैनिकांनी विचार करावा की, उद्धव ठाकरे तुम्हाला कसे वापरून घेतात. जेव्हा तुमचा वापर संपतो तेव्हा तुम्हाला च्युइंगमसारखे थुंकतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे रामदास कदम, अशी बोचरी टीका रामदास कदम यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“लग्नाला उशीर केल्यास मुली पॉर्न पाहत बसतील, त्यामुळे वयात आल्यावर त्याचं लग्न लावा” 

“उद्धव ठाकरे हा व्यक्ती आयुष्यात कोणाचाच झालेला नाही” 

मोठी बातमी! मंत्री नवाब मलिक यांना आणखी एक झटका 

‘बंगळुरूतील त्या समाजकंटकांना शोधून काढा’; अजित पवारांचा कर्नाटकला इशारा 

‘…तसं महाराष्ट्रात पुन्हा झाल्यास सोडायचं नाही’; राज ठाकरेंचा इशारा