आदित्य ठाकरे येताच नितेश राणेंकडून ‘म्याऊ… म्याऊ’च्या घोषणा, पाहा व्हिडीओ

मुंबई | अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून विधानभवनात अजब प्रकार घडला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भाजप नेते आणि आमदार नितेश राणेंनी खिल्ली उडवल्याचं पाहायला मिळत आहे.

आज आदित्य ठाकरे विधानसभेत प्रवेश करत असताना विधीमंडळाच्या पायरीवर आंदोलन करत असलेल्या नितेश राणेंनी आदित्य यांना पाहून म्याऊ… म्याऊच्या घोषणा दिल्या. नितेश राणे या घोषणा देत असताना भाजपचे नेते मात्र हसत होते.

आमदार नितेश राणेंसह भाजपचे इतर आमदार पायरीवर बसून विविध मुद्द्यांवरून सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते. शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जात आहे. परीक्षा घोटाळा आदी मुद्द्यांवरून विरोधक विधानभवनाच्या पायरीवर घोषणा देत होते.

विरोधक घोषणा देत असताना आदित्य ठाकरे हे मंत्री सुनील केदार यांच्यासह विधानसभेत जायला निघाले. त्यावेळी नितेश राणे यांनी म्याऊ… म्याऊ… म्याऊ… म्याऊ… अशा जोरजोरात घोषणा द्यायला सुरुवात केली.

नितेश राणे वारंवार या घोषणा देऊन स्वत:ही हसत होते. त्यांच्या घोषणांवर भाजपचे नेतेही हसत होते. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. सध्या सोशल मीडियावर नितेश राणेंचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान, विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. पहिल्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादावादी झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही काहीसा असाच प्रकार पहायला मिळाला आहे.

आता दुसऱ्या दिवशी आज वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा विधानभवनावर धडकणार आहे. ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरुन आता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे रस्त्यावर उतरणार असून ते स्वत: या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता; ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर? 

‘आपला बाप आजारी असताना…’; उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना आव्हाडांनी झाप झाप झापलं 

Corona लस घेतलेल्यांसाठी गुड न्यूज; ‘ही’ दिलासादायक बातमी आली समोर 

“अजित पवारांना मुख्यमंत्र्यांचा चार्ज दिला, तर ते 4 दिवसांत राज्य विकून मोकळे होतील” 

विरोधकांच्या राड्यानंतर भास्कर जाधव यांच्याकडून सभागृहाची माफी, म्हणाले…