“उद्धव ठाकरे हा व्यक्ती आयुष्यात कोणाचाच झालेला नाही”

मुंबई | शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत मनातील खदखद बोलून दाखवली. तसेच मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावरून आता भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी रामदास कदम आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे हा व्यक्ती आयुष्यात कोणाचाच झालेला नाही, असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

उद्धव ठाकरे हा व्यक्ती आयुष्यात कोणाचाच झालेला नाही. उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी वापरला आहे. असंख्य शिवसैनिकांनी रामदास कदम या घटनेचा बोध घ्यायला पाहिजे, अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी केली आहे.

राणे साहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा याच रामदास कदमांना उद्धव ठाकरेंनी विरोधीपक्ष नेता बनवलं होतं. तेव्हा ते जिभेला हाड नसल्यासारखे आमच्यावर बोलायचे. आता कदमांसारख्या असंख्य शिवसैनिकांनी विचार करावा की, उद्धव ठाकरे तुम्हाला कसे वापरून घेतात, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

जेव्हा तुमचा वापर संपतो तेव्हा तुम्हाला च्युइंगमसारखे थुंकतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे रामदास कदम. आज मी रामदास कदमांना सांगेन की, तुमची आज काय अवस्था झाली आहे. तुम्ही आज राजकारणामध्ये कुठेच नाहीत आणि राणे साहेब केंद्रात मंत्री आहेत. या फरकाचा रामदास कदमांनी विचार करावा, असं नितेश राणे म्हणालेत.

शिवसेना ही उद्धव ठाकरे चालवत नाहीत तर अनिल परब, आदेश बांदेकर, अनिल देसाई, वरुण सरदेसाई यांसारखे बिनकामाचे जे लोंबते आहेत ते शिवसेना संपवायला निघाले आहेत. सामान्य आणि कडवट शिवसैनिकाला स्थान उरलेलं नाही. चार-पाच टाळक्यांनी शिवसेनेला हायजॅक केल्याचं नितेश राणेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, अनिल परब यांनी आपल्या कार्यक्षेत्रात घुसखोरी करत आपलं आणि आपल्या मुलाचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा घाट घातल्याचा गंभीर आरोप कदम यांनी केला आहे. तसेच उद्धव ठाकरेंनी याप्रकरणात लक्ष घालावं, अशी विनंती त्यांनी केलीये.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! मंत्री नवाब मलिक यांना आणखी एक झटका 

‘बंगळुरूतील त्या समाजकंटकांना शोधून काढा’; अजित पवारांचा कर्नाटकला इशारा 

‘…तसं महाराष्ट्रात पुन्हा झाल्यास सोडायचं नाही’; राज ठाकरेंचा इशारा 

अजित पवारांकडून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं दर्शन; ‘या’ कृतीची महाराष्ट्रभर चर्चा 

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट”