“…आता बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आलीये”

मुंबई | राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून राज्यात राजकारण पेटलं आहे. एनसीबीच्या कारवाईमुळे राज्यात भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात सध्या जोरदार राजकीय युद्ध रंगलं आहे. अशातच आता भाजप आमदार नितेश राणे यानी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.

फडणवीस यांनी मलिक यांच्यावर आरोप करताना 1993 च्या बाॅम्बस्फोटाचा उल्लेख केला होता. या दहशतवादी हल्ल्यातील व्यक्तींकडून मलिक यांनी जमीन खरेदी केल्याच्या आरोपांनी राज्यात खळबळ माजली आहे.

मलिक यांनी फडणवीस यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. जमीन व्यवहारात कसलाही गैरव्यवहार झाला नसल्याचं मलिक म्हणाले आहेत. नितेश राणे यानी मलिक यांच्यावर टीका करताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केल्याचं पहायला मिळालं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेत उद्धव ठाकरे यांच्यावर नितेश राणे यांनी टीका केली आहे.

93 च्या दंगलीत बाळासाहेबांनी हिंदूंना वाचवलं. आता त्यांचाच मुलगा 93 दंगलीच्या आरोपींचा पार्टनर असलेल्या मंत्र्याबरोबर मांडीला मांडी लाऊन सत्ता उपभोगतोय, अशी जहरी टीका राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

खरं तर आता बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आली आहे. शिवसैनिक हे करणार का?, नाहीतर मीच जाऊन शिंपडतो. या शब्दात नितेश राणे यांनी शिवसेना आणि सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे.

नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर ज्या प्रकरणावरून आरोप केले आहेत ते प्रकरण फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत राज्याला सांगतिलं आहे. या प्रकरणातील आरोपींचा आणि मलिक यांच्या कंपनीचा संबंध असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता.

दरम्यान, एनसीबी, आयकर विभाग, ईडी, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवरून राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

 नवाब मलिक यांनी अखेर हायड्रोजन बाॅम्ब फोडला; देवेंद्र फडणवीसांवर केले गंभीर आरोप

मंत्री झालो पण, कोणी नामदार म्हणतच नाही- रावसाहेब दानवे

‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 10 हजारांचे झाले इतके कोटी

आम्ही आमचं म्हणणं राज्यपालांकडे मांडलं, सत्याचाच विजय होईल- क्रांती रेडकर 

“इंदोरीकर महाराज लस घेत नाहीत, तोपर्यंत त्यांचं कीर्तन होऊ देऊ नका”