‘याला नाही औरंगजेबाकडं पाठवलं तर…’; नितेश राणेंचं एमआयएमला आव्हान

मुंबई | राज्यात महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये वाद चालू असताना आता एमआयएमच्या एका कृतीमुळं वादात आणखीन भर पडली आहे.

एमआयएमचे आमदार अकबरूद्दीन ओवैसींनी औरंगाबादमध्ये औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे.

राज्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी आता आपला मोर्चा एमआयएमकडं वळवला आहे. सर्व नेते एमआयएमवर जोरदार टीका करत आहेत.

भाजप आमदार नितेश राणेंनी तर विस्फोटक शब्दात वक्तव्य केलं आहे. नितेश राणेंनी वक्तव्य करताना पोलिसांना बाजूला करण्याचं आवाहन सरकारला केलं आहे.

मी आव्हान करतो, पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा, याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर आम्ही शिवरायांचे मावळे नाही, असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं आहे.

नितेश राणेंच्या या वक्तव्यानंतर आता राज्यात मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कायदा आणि सुव्यवस्थेवर नितेश राणेंंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

दरम्यान, औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी औवेसींनी कबरीवर माथा टेकण्याच्या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या – 

 ‘मनी लाॅंड्रिंग प्रकरणात आदित्य ठाकरेंची चौकशी होणार’; भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

कोण होणार ‘IPL 2022’ चा बादशहा?, दोन संघ बाहेर पडताच आठ संघांमध्ये चुरस

 ‘किधर छुप्या है अमित ठाकरे…’; दिपाली सय्यद यांची राज ठाकरेंवर टीका

“ज्यांना घरातून बाहेर काढलं, त्यांच्यावर काय बोलू?, त्यांची लायकी नाही”

बाथरूममध्ये SEX करण्याची इच्छा जीवावर बेतली; अत्यंत धक्कादायक प्रकार समोर