मुंबई | आपल्या देशात नेहमीच धर्माबद्दल काहीतरी वाद चालू असतात. राजकीय नेते, अभिनेते आपल्या अकलेचे तारे तोडतात की देशात गोंधळ निर्माण होतो. आताही काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावरून देशात मोठा वाद निर्माण झाला आहे.
सलमान खुर्शीद आपल्या बेताल वक्तव्यांसाठी देशात परिचीत आहेत. आपल्या वक्तव्यांनी त्यांनी अनेकदा आपल्या पक्षाला अडचणीत आणलं आहे.
खुर्शीद यांचं नुकतंच अयोध्या नावाचं पुस्तक प्रकाशित झालं आहे. या पुस्तकात खुर्शीद यांनी हिंदु धर्माची तुलना कुख्यात दहशतवादी संघटनेशी केली आहे. परिणामी सर्वस्तरातून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे.
भाजप आमदार नितेश राणे यांनी आपल्या खास शैलीत खुर्शीद यांचा समाचार घेतला आहे. नितेश राणे राज्याच्या राजकारणात बेधडक आणि जहरी टीका करण्यासाठी ओळखण्यात येतात.
नितेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून खुर्शीद यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सलमान खुर्शीद आणि अख्तर सारख्या नालायकांना एक दिवस तरी ISIS सारख्या संघटनेच्या हवाली केलं पाहिजे, असं राणे म्हणाले आहेत.
या दोघांनाही आयसिसच्या हवाली केलं तर हिंदुत्व आणि त्यांच्यामध्ये काय खरा फरक आहे याबद्दल ते तोंड उघडणार नाहीत, अशी सडेतोड टीका राणे यांनी केली आहे.
खुर्शीदच्या पुस्तकाची पाने फाडण्यापेक्षा एक दिवस त्यालाच टराटरा फाडण्याचा कार्यक्रम घ्यावा लागेल, या शब्दात नितेश राणे यांनी सलमान खुर्शीद यांचा समाचार घेतला आहे.
सलमान खुर्शीद यांनी हिंदुत्वातील वाढत्या आक्रमकेमुळं खर हिंदुत्व लोप पावत आहे. या आशयाचं लिखाण आपल्या पुस्तकात केलं आहे.
हिंदुत्वातील वाढत्या आक्रमकतेचा थेट संबंध त्यांनी बोको हराम आणि आयसिस या दहशतवादी संघटनांशी लावल्यानं देशातील वातावरण पेटलं आहे.
दरम्यान, सलमान खुर्शीद यांच्या या लिखाणावर ज्येष्ठ काॅंग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी सडकून टीका केली आहे. सर्वस्तरातून खुर्शीद यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
“जे तलवार चालवतात ते तलवारीच्या घावानेच मरतात”
“कंगनाचा पद्मश्री काढून घ्या, ओव्हर डोस घेऊन जास्त बोलतीये”
“कंगनाबेनला दिलेले पुरस्कार परत घ्या, लाज लज्जा असेल तर तिने देशाची माफी मागावी”
‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 1 लाखांचे बनले 1 कोटी
“राज्यात बिग बॉसचा शो सुरू आहे की काय? अशी शंका येते”