टेन्शन वाढलं! गेल्या 24 तासात कोरोना मृत्यूदरात अचानक वाढ

नवी दिल्ली | गेल्या जवळपास दोन वर्षांपासून कोरोना महामारीने संपूर्ण जगभरात थैमान घातल्याचं चित्र पहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतामध्ये लॉकडाऊनसह अनेक कडक निर्बंध लागू करण्यात आले होते.

कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली होती. पण आता कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्यामुळे निर्बंधांमधून नागरिकांना शिथिलता देण्यात आली आहे.

असं असलं तरी सणासुदीच्या काळात कोरोना रूग्णसंख्या वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानंतर आता काही राज्यात कोरोना रूग्णसंख्या वाढल्याचं दिसून येतंय.

मागच्या 24 तासात देशभरात 12 हजार 516 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना रूग्णसंख्येत घट झाल्याचं दिसत असलं तरी आता कोरोनाच्या मृत्यूदरात अचानक वाढ होताना दिसत आहे.

झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या आता आटोक्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पण गेल्या 24 तासात देशात 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूमुळे आता केंद्र सरकारच्या देखील अडचणी वाढल्याचं दिसतंय. गुजरात आणि कर्नाटकमध्ये कोरोना रूग्णसंख्या वाढताना दिसत आहे.

सध्या देशभरात 1 लाख 37 हजार 416 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर मागच्या 24 तासात 501 कोरोनाबाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.

आतापर्यंत 04 लाख 62 हजार 690 कोरोनाबाधित रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. देशभरात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असून भारताने 100 कोटीपेक्षा अधिक विक्रमी टप्पा पार केला.

तर महाराष्ट्रात देखील गेल्या 24 तासात 997 रूग्ण आढळले आहेत. त्यात 27 रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. मात्र, गुररातची स्थिती चिंताजनक असल्याचं दिसून येतंय.

तसेच सर्व नागरिकांनी लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवत लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करून घ्यावा असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या- 

एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चिघळलं! राज्यभरातील 376 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

रोहित शर्मा भारताचा नवा कर्णधार; आयपीएलमध्ये झळकलेल्या ‘या’ चार युवा खेळाडूंची संघात वर्णी

बहुप्रतिक्षित ‘Maruti Suzuki Celerio’ उद्या बाजारात धडकणार; जाणून घ्या किंमत

खवय्यांना महागाईचा दणका! हाॅटेलचं जेवण तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांनी महागणार