नितेश राणेंना अटक होणार???; पोलिसांच्या हालचालींना वेग

मुंबई | कणकवलीमध्ये घडलेल्या मारहाणीमुळे आमदार नितेश राणे (Nitesh rane) यांच्या अडचणी वाढल्या होत्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (Sindhudurg District) शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यावरून आता नितेश राणे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांची दोनवेळी पोलीस चौकशी झाली आहे. सिंधुदुर्ग पोलीस या प्रकरणात चौकशी करत असून काल पोलिसांना हाती मोठं यश आलं.

या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीत अटक केली आहे. त्यानंतर आता नितेश राणे यांच्या अटकेची मागणी होत आहे. शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्याने आता नितेश राणे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

नितेश राणे यांना कालदेखील चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी नितेश राणे चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्यामुळे आता पोलीस नितेश राणे यांच्या घरी देखील गेले होते.

नितेश राणे नारायण राणे यांच्यासह दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता गोव्यात देखील फिल्डींग लावण्यात आली आहे.

आज मुंबईत विधानभवनात नितेश राणे उपस्थित राहिले तर मुंबई पोलिसांच्या मदतीने नितेश राणे यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता आहे.

आज विधीमंडळात देखील शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता नितेश राणेंना अटक होणार का?, असा सवाल उपस्थित केला जातोय.

संतोष परब हल्ल्यातील केसमध्ये गुंतवत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांच्या या हल्ल्याबाबत सुरू असलेल्या चौकशीवरून मला या विनाकारण अडकवण्यात येतंय, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, संतोष परब हल्ला प्रकरणात सत्ताधारी आघाडी नितेश राणेंना गोवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार?, शरद पवार म्हणाले…

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रेंगाळण्याची चिन्हे; राज्यपालांची हरकत

‘नितेश राणेंनी चुकच केली’; देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा झापलं

‘तो चाऊन येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव’; विधानसभेत पुन्हा राडा 

“अजित पवार स्वतःच्या नाकातला शेंबुड पुसा अगोदर”