उद्धवजी, काय तो निर्णय घेऊनच टाका… मी तुमच्या सोबत आहे; नितेश राणेंचं ट्वीट

मुंबई |  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तिथीचा हट्ट सोडून शिवजयंतीची तारीख 19 फेब्रुवारी जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्वीट केलं होतं. त्यांच्या या ट्वीटनंतर भाजप नेते नितेश राणे यांनीदेखील ट्वीट करत शिवसेनेला टोला लगावला आहे.

राज्यात राष्ट्रवादीची सत्ता आहे तर मग एकच शिवजयंती झाली पाहिजे. एकदा काय तो शिवजयंतीचा वाद मिटवूनच टाका. मी एक शिवप्रेमी म्हणून तुमच्यासोबत आहे. हीच ती वेळ…. असं म्हणत नितेश यांनी शिवसेनेला चिमटा काढला आहे.

छत्रपती शिवरायांचा जन्म झाला त्यावेळी इंग्रज भारतात नव्हते. त्यामुळे इंग्रजी पद्धतीने कालगणनाही केली जात नव्हती. तेव्हा महाराजांची जयंती ही मराठी तिथीप्रमाणेच साजरी व्हायला हवी, ही शिवसेनेची सातत्याने भूमिका राहिलेली आहे.

शिवसेनेसोबत सत्तेत सामिल असलेल्या राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना हे आवाहन केल्याने ते काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. शिवसेना भाजपसोबत सत्तेत होती तेव्हाही त्यांनी शिवजयंती तिथीनुसारच साजरी व्हावी, अशी मागणी वारंवार केली होती. आता राज्यातली सत्तासमीकरणं बदलली आहे. त्यामुळे उद्धव काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचंय.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-आमचा आवाज दाबणं इतकं सोप का आहे?; झायरा वसीमचा मोदींना सवाल

-उद्धवजी, पीडितेचा जीव वाचवा… तिच्यावर चांगल्या रूग्णालयात उपचार करा- चित्रा वाघ

-…अन् राज ठाकरेंनी दिलं संजय मिस्त्रींना मनसेत येण्याचं निमंत्रण!

-उद्धवजी, शिवजयंती साजरी करताना तिथी सोडा आणि तारीख धरा; राष्ट्रवादीचं आवाहन

-भाजप खासदाराच्या चोराच्या उलट्या बोंबा; आता म्हणतात मी तसं म्हणलोच नाही…!