‘भाषेऐवजी भावना आणि शब्दांऐवजी संवेदना समजून घ्या’, ‘त्या’ पत्रावरून रोहित पवारांची MPSCला विनंती

मुंबई | काही उमेदवारांकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कामकाजाबद्दल असभ्य, असंस्कृत आणि असंसदीय भाषा वापरणाऱ्यात आली. या उमेदवारांविरोधात आयोगाने कारवाईचा बडगा उचलला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्य पद्धतीबद्दल चुकीची भाषा वापरणाऱ्या उमेदवारांना काही कालावधीसाठी किंवा कायमस्वरूपी परीक्षेला बसण्याची परवानगी नाकारण्यात येईल, असा इशारा एसपीएससीकडून देण्यात आला.

एमपीएससीच्या या भूमीकेवरून अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एमपीएससीला हे पत्र मागे घेण्याची विनंती केली आहे.

एमपीएससीला आवाहन करणारे एक ट्विट रोहित पवार यांनी केले आहे. मुलांच्या भाषेऐवजी भावना आणि शब्दांऐवजी संवेदना समजून घ्या, असे आवाहन रोहित पवार यांनी केले आहे.

मुलांनी भाषा योग्य वापरावी,यात शंकाच नाही, असं वक्तव्य रोहीत पवार यांनी केलं आहे. तर ‘भाषेऐवजी भावना आणि शब्दांऐवजी संवेदना समजून घेऊन हे पत्र मागं घ्यावं’, अशी विनंती रोहित पवार यांनी विद्यांर्थ्यांच्या वतीने केली आहे.

एमपीएससीनेही अचानक परीक्षा रद्द करणं, निकाल वेळेत न लावणं, मुलांच्या शंकेचं वेळीच निरसन न करणं, हे टाळावं, असा सल्ला देखील रोहित पवार यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला दिला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या  या भूमीकेवरून विद्यार्थ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. एमपीएससीच्या परीक्षा वेळेवर न होणे, वेळेवर मुलाखती न होणे, असा सावळा गोंधळ सध्या पाहायला मिळत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऐनवेळी परीक्षा रद्द करण्यात आल्या. अनेकदा परीक्षेची तारीख बदलली, यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.

त्यात एमपीएससीने जारी केलेल्या पत्रामुळे विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भूमीकेवरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

“नितेश राणे हरवला आहे, शोधणाऱ्याला एक कोंबडी बक्षीस”

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू

टेन्शन वाढलं! राज्यातील ‘या’ पाच बड्या नेत्यांना कोरोनाची लागण

‘जवा बघतीस तू माझ्याकडं’ गाण्यावर आमदाराने धरला ठेका; पाहा व्हिडीओ

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता; पोलिसांच्या सुट्ट्या रद्द