रांची | महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपशी फारकत घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी संसार करणं पसंत केलं. परंतू शिवसेनेच्या याच भूमिकेवर केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातील शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती फार काळ टिकणार नाही. तसंच काँग्रेससोबत जाण्याची किंमत शिवसेनेला चुकवावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
नितीन गडकरी यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी शिवसेनेवर जोरदार आसूढ ओढले. निवडणुकीपूर्वी एका पक्षाशी युती करायची आणि नंतर दुसऱ्या पक्षासोबत जायचं ही गोष्ट सिद्धांताच्या आधारावर चुकीची आहे, असं म्हणत त्यांनी शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.
केवळ मुख्यमंत्रिपदासाठी भाजपची शिवसेनेने साथ सोडणं हे जनतेला रूचणार नाही. शिवसेना कायम बाळासाहेब ठाकरेंच्या ज्या हिंदुत्वाचा दाखला देते ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मान्य नाही. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेची झालेली युती ही संधीसाधू आहे, असं गडकरी म्हणाले.
दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला महाराष्ट्राच्या जनतेने नाकारले होते. तरीही शिवसेनेने या 2 पक्षांक्षी युती केली. पण आता शिवसेनेला याची किंमत मोजावीच लागेल, असं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
हा देश आता मुस्लिमांचा राहिला नाही; मेहबूबा मुफ्तींच्या मुलीला खंत https://t.co/lY1bRDMa5j @MehboobaMufti
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 5, 2019
कांद्याचे दर वाढून 2 महिने झाले मग कांदा आयात करण्याचा निर्णय आता का?- राजू शेट्टी https://t.co/gi2YiMkIFt @rajushetti
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 5, 2019
गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता https://t.co/tg8dA9UVeZ @girishdmahajan @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 5, 2019