Nitin Gadkari: “60 किलोमीटर अंतरावर…”, नितीन गडकरींची लोकसभेत मोठी घोषणा

मुंबई | मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांंचं नाव घेतलं जातं. मागील काही वर्षात त्यांनी अनेक कामं करून दाखवली आहे.

2024 पर्यंत भारतातील रस्ते अमेरिकेसारखे करू दाखवू, असं आश्वासन त्यांनी दिलं होतं. त्यानंतर त्यांनी अनेक धडाडीचे निर्णय घेत अनेक कामं मार्गी लावली. अशातच आता नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे.

देशातील राष्ट्रीय महामार्गांवर 60 किलोमीटर अंतरात एकच टोलनाका राहतील अशी रचना करण्यात येणार असल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. लोकसभेत बोलताना त्यांनी ही घोषणा केली.

सध्याच्या अंतरात जर दुसरा टोलनाका असेल तर येत्या तीन महिन्यांत त्या अंतरात एकच टोलनाका राहील, असं आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिलं आहे.

रस्ते अपघाताचं प्रमाण वाढतंय त्यामुळे आपल्याला प्रयत्न करावे लागतील आणि त्यादिशेने आम्ही पावले टाकत असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, देशात 2024 वर्ष अखेरपर्यंत अमेरिकेसारखे रस्त्यांचे जाळे आपणास दिसेल, असं आश्वासन देखील त्यांनी यावेळी लोकसभेत दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

चीनमध्ये कोरोनाचं थैमान! सरकारच्या ‘या’ आदेशाने लोकांमध्ये भीतीचं वातावरण

Narayan Rane: “आगे आगे देखिए होता है क्‍या!”, नारायण राणेंचं शिवसेनेवर टीकास्त्र

Uddhav Thackeray: “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा”

Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! मेव्हण्याची संपत्ती ईडीकडून जप्त

सलमान खानला होता ‘हा’ गंभीर आजार; स्वत: भाईजानने केला धक्कादायक खुलासा