Sharad Pawar: शरद पवार म्हणतात, “ऊसाचं बिल कर्ज काढून नव्हे, तर माल विकून द्या”

मुंबई | सहकार क्षेत्रात मागील तीन दशकांपासून आपला दबदबा कायम राखणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी कारखान्यांना मोलाचा सल्ला दिला आहे.

शरद पवार यांनी काल सोमेश्वर येथील कारखान्याला भेट दिली. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम आता भारतावर होऊ लागला आहे, असं शरद पवार म्हणाले.

इंधनाचे दर वाढले आहेत ही गोष्ट खरी आहे व ती आणखी वाढेल अशी शक्यता असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. निवडणुका होत्या त्यामुळे केंद्रातून आवश्यक पाऊले उचलली गेली नाहीत, असं पवार म्हणाले.

एकरकमी एफआरपी देण्यास हरकत नाही, मात्र ते कर्ज काढून द्यायला पाहिजे, असं शरद पवार म्हणाले आहेत. पुढे बोलताना पवार म्हणतात, कर्ज कुणी काढायचे तर ते साखर कारखान्यांनी, आणि कारखाने कोणाचे आहेत, तर ते शेतकऱ्यांचे… त्यामुळे या दृष्टीने विचार होयला हवा.

मला वाटते की शेतकऱ्यांना वेळेवर पैसे दिलेच पाहिजे. मात्र, शक्यतो कर्ज काढून देवू नका ते माल विकून द्या, असं मत शरद पवारांनी यावेळी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, इथेनॉलची खरेदी अन् किंमत ही गोष्ट देखील साखरे इतकी महत्वाची असल्याचं शरद पवारांनी यावेळी म्हटलं आहे. त्यावर देखील केंद्राने भर देयला हवा, असं मत देखील पवारांनी यावेऴी व्यक्त केलंय.

महत्त्वाच्या बातम्या – 

Nitin Gadkari: “60 किलोमीटर अंतरावर…”, नितीन गडकरींची लोकसभेत मोठी घोषणा

चीनमध्ये कोरोनाचं थैमान! सरकारच्या ‘या’ आदेशाने लोकांमध्ये भीतीचं वातावरण

Narayan Rane: “आगे आगे देखिए होता है क्‍या!”, नारायण राणेंचं शिवसेनेवर टीकास्त्र

Uddhav Thackeray: “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा”

Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! मेव्हण्याची संपत्ती ईडीकडून जप्त