पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मुंबई | इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत (Fuel Prices Increase). तेल कंपन्यांनी 5 दिवसात 4 वेळा किंमत वाढवली आहे. आता पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80-86 पैशांनी वाढ करण्यात आली आहे.

पेट्रोल-डिझेल दरवाढीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.गडकरींनी गेल्या चार दिवसांत तीन वेळा झालेल्या इंधन दरवाढीचं समर्थन केलं आहे.

‘एबीपी नेटवर्क’च्या ‘आयडियाज ऑफ इंडिया’ परिषदेत ‘न्यू इंडिया, न्यू मेनिफेस्टो – सबका साथ, सबका विकास’ या सत्रात गडकरी बोलत होते.  यावेळी त्यांनी इंधन दरवाढीचं कारण सांगितलंय.

रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia and Ukraine War) सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्या आहेत. ही परिस्थिती भारत सरकारच्या नियंत्रणाबाहेर आहे, असं गडकरींनी सांगितलं आहे.

भारतात 80 टक्के कच्चं तेल आयात केलं जातं. रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या (Crude Oil) किमती वाढल्या आहेत. आम्ही त्यामध्ये काहीही करू शकत नाही, असं ते म्हणालेत.

2014 पासून भारताला स्वावलंबी बनविण्यावर भर दिला जात आहे. या मोहिमेद्वारे आपण स्वतःचं इंधन तयार केलं पाहिजे. स्वदेशी ऊर्जानिर्मिती क्षमता विकसित करण्याच्या गरजेवर जास्त भर दिला पाहिजे, असं नितीन गडकरी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या – 

संधी सोडू नका! iPhone 13 वर मिळतोय आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट 

पोस्टाची भन्नाट योजना; तुमचे पैसे होतील दुप्पट

अनिल परबांचं रिसॉर्ट तोडण्यासाठी मोठा हातोडा घेऊन सोमय्या दापोलीकडे रवाना! 

आयपीएलपूर्वी राजस्थान रॉयल्समध्ये वाद, संजू सॅमसन भडकला 

 “एवढाच जीव जळत असेल तर मला टाका तुरुंगात”