मुंबई : बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी2’च्या दुसऱ्या पर्वाच्या विजेतेपदाच्या ट्रॉफीवर शिव ठाकरेने आपले नाव कोरले आहे. बिग बॉसचे होस्ट महेश मांजरेकर यांनी त्याच्या नावाची घोषणा केली. अंतिम टप्प्यात शिव ठाकरे. वीणा जगताप, नेहा शितोळे, शिवानी सुर्वे, किशोरी शहाणे-वीज आणि आरोह वेलणकर यांच्यात जोरदार स्पर्धा झाली. दरम्यान, सोशल मीडियावरही बिग बॉसच्या विजेतेपदाबाबत घमासान चर्चा झाली.
विशेष म्हणजे 1 सप्टेंबर बिग बॉसचा विजेता निवडण्यासाठी वोटिंग लाईन्स बंद झाल्या होत्या. मात्र, विविध मनोरंजन वाहिन्या आणि वेबसाईट्सनी बिग बॉसच्या चाहत्यांची उत्सुकता लक्षात घेत सोशल मीडियावर आपापले पोल्स घेतले होते.
मीडियावरुन घेतलेल्या बहुतांश पोल्समध्ये प्रेक्षकांनी बहुमताने शिव ठाकरेला आपली पसंती दिली होती. आठवड्याभरात सहा जणांपैकी शिव ठाकरे वगळता इतर सर्व स्पर्धकांचा पसंतीक्रम बदलत गेला होता. मात्र शिवने निर्विवादपणे आपलं पहिलं स्थान अढळ ठेवलं.
रविवारी झालेल्या बिग बॉस मराठी ग्रँड फिनालेमध्ये बिग बॉसच्या घरातील अनेक स्पर्धकांनी नृत्याविष्कार सादर केला. काही ठिकाणी भावनिक क्षणही पाहायला मिळाले.
महत्वाच्या बातम्या-
आबा तुम्ही माझं ऐकलं असतं तर…- शरद पवार https://t.co/Ck93pgYzUM @PawarSpeaks @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 2, 2019
इशांत शर्माचं अर्धशतक अन् कोहलीच धमाकेदार ‘सेलिब्रेशन’! – https://t.co/QSk4wgkI1S @imVkohli @ImIshant @BCCI
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 1, 2019
इशांत शर्माचं अर्धशतक अन् कोहलीच धमाकेदार ‘सेलिब्रेशन’! – https://t.co/QSk4wgkI1S @imVkohli @ImIshant @BCCI
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 1, 2019