“काही झालं तरी राज्यातील महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे नक्की टिकेल”

अहमदनगर |  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या लेटरबॉम्बमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी पक्षांमध्ये आ.रोप-प्रत्यारोपाची खेळी रंगलेली पाहायला मिळत आहे.

परमबीर यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर काही गंभीर आ.रोप केले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकारपरिषद घेतली. 

शरद पवार यांची दिल्लीत पत्रकारपरिषद सुरु असताना सोशल मिडियावरुन भाजप नेते पटापट प्रतिक्रिया देत होते. हे सगळं पाहता भाजपचा काहीतरी मोठा प्लॅन दिसतोय, असं  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

मंगळवारी 23 मार्च रोजी रोहित पवार यांनी अहमदनगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला.  काही झालं तरी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार 5 वर्षे नक्की टिकेल, असा दावा रोहित पावर यांनी केला आहे.

सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत, असा भास विरोधकांकडून निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तानी लिहिलेल्या पत्रातील तारखांचा मेळ लागत नाहीय. त्यामुळे हा सर्व प्रकार राजकीय युती असल्याचा संशय निर्माण होत आहे, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

परमबीर सिंह जेव्हा आयुक्तपदी होते. त्याचवेळी त्यांनी यासर्व प्रकाराची वाच्यता का नाही केली?, पद गेल्यानंतर आत्मविश्वासाने त्यांनी हा विषय मांडला. त्यामुळे परमबीर सिंह यांच्यामागे राजकीय ताकद असल्याचं काही लोकांना वाटतं आहे. त्याचप्रमाणे विरोधकही याप्रकरणाबाबत चुकीची माहिती पसरवत असल्याचा आ.रोप रोहित पवार यांनी केला आहे.

तसेच राज्यातील कित्येक प्रश्न केंद्र सरकारकडे अडकलेले असताना त्यावर कोणी काही बोलत नाही. परंतू असे काही विषय निघाल्यावर हे सर्व बोलायला लागतात. भाजपच्या हातात फक्त राजकारण करणं एवढं एकच उरलेलं आहे. आतादेखील दोन-तीन महिने प्रकरण तापवतील,नंतर सत्य बाहेर येईल. या सगळ्या माध्यमातून भाजप लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही रोहित पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीसांनी मागितली…

जाणून घ्या! कांद्याच्या सालीचे ‘हे’ आरोग्यदायी…

‘या’ अभिनेत्रीनं केली होती कंडोमची पहिली…

मुलगी दिली नाही म्हणून मुलीच्या आईलाचं पळवलं अन्…..

‘राष्ट्रपती लागवट लागू करा’; म्हणणाऱ्यांवर जयंत…