मुंबई | गृहपाठ (Home Work) करण्याचा कंटाळा कोणाला येत नाही. सर्वांनाच शाळेत असताना गृहपाठ करण्याचा कंटाळा येत असे. पण आता त्यावर महाराष्ट्र शासनाने तोडगा काढला आहे.
आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यातील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा राज्य शासन गृहपाठ (Home Work) बंद करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.
त्यासंदर्भात माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली आहे. ते पुण्यात माध्यमांसोबत बोलत होते. मात्र यावेळी त्यांनी असेही सांगितले की, गृहपाठ बंद करण्याचे माझे व्यक्तीगत मत आहे.
त्यामुळे शिक्षक संघटना, पालक, संस्थाचालक आदी घटकांशी चर्चा करणार असल्याचे देखील केसरकरांनी सांगितले. सर्वांसोबत चर्चा करुन आणि एकमत झाल्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे केसरकर म्हणाले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळ (Maharashtra State Board of Secondary and High Secondary Education) येथे केसरकरांनी शुक्रवारी शिक्षण विभागाची आढावा बैठक घेतली. त्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.
मुलांवर अभ्यासाचे ओझे देऊ नये, त्यांच्या मेंदुचा विस्तार व्हावा तसेच गृहपाठ ही शिक्षकांसाठी पळवाट असता कामा नये त्यासाठी आम्ही या मुद्द्याचा विचार करीत आहोत, असे केसरकर म्हणाले.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सहजपणे कळेल असे शिकविले पाहिजे, जेणेकरुन त्यांना गृहपाठाची गरजच वाटणार नाही, असे म्हणत केसरकरांनी पुढील शैक्षणिक वर्षापासून गृहपाठ बंद करण्यात येणार असल्याचे सूचविले आहे.
महत्वाच्या बातम्या –
दसरा मेळाव्याला ‘शिवजी पार्क’ सुने सुने राहणार!
WhatsApp वापरणाऱ्यांना मोठा झटका; पुढील महिन्यापासून ‘या’ फोनमध्ये नाही चालणार WhatsApp
Electric Vehicles घेत असाल तर थोडं थांबा, लवकरच येत आहेत या दमदार गाड्या; वाचा सविस्तर
शिंदे समर्थक आमदाराची काँग्रेस शिवसेनेवर टीका करताना जीभ घसरली; विरोधकांची तुलना केली थेट…