नोबेल शांतता पुरस्कार पटकवणारी मलाला अडकली लग्नबंधनात; ‘या’ व्यक्तीसोबत बांधली लग्नगाठ

नवी दिल्ली | नोबेल शांतता पुरस्कार पटकवणारी मलाला युसुफजई काल लग्नबंधनात अडकली. मलाला युसुफजई हिने बर्मिंगहममध्ये लग्न केलं. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला.

मलालानं काल सोशल मीडियावर लग्नसमारंभाचं फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. बर्मिंगहॅम येथील निवासस्थानी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आयुष्यातला सगळ्यांत महत्त्वपूर्ण दिवस असल्याचं मलाला युसूफझाईनं फोटो शेअर करत म्हटलं.

फोटो शेअर करत मलालानं म्हटलं की, आजचा दिवस माझ्या आयुष्यातील खूप खास दिवस आहे. असर आणि मी आयुष्यभरासाठी लग्नगाठ बांधली आहे. आम्ही हा लग्नसोहळा घरीच पार पडला. बर्मिंगहॅम येथील घरी आमच्या कुटुंबियांसोबत निकाह सोहळा पार पडला.

पुढे मलाला म्हणाली की, आम्हाला आशीर्वाद द्या. पुढच्या वैवाहिक आयुष्यासाठी आम्ही उत्सुक आहे. मलालाची ही पोस्ट आणि फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

मलाला आणि असरवर शुभेच्छांचा वर्षावही पहायला मिळत आहे. अनेकजण कमेंट करत, फोटो शेअर करत तिला पुढील नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

मलालाचा पती असर मलिक हा पाकिस्तान क्रिकेट बोर्डात मॅनेजर पदावर काम करतो. याआधी तो पाकिस्तान सुपर लीगसाठी काम करत होता.

 

महत्त्वाच्या बातम्या – 

  लस घेतल्यानं महिलेचं नशीब फळफळलं, ‘अशी’ बनली कोट्यावधींची मालकीण

  ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 10 हजारांचे झाले इतके कोटी

आम्ही आमचं म्हणणं राज्यपालांकडे मांडलं, सत्याचाच विजय होईल- क्रांती रेडकर 

“इंदोरीकर महाराज लस घेत नाहीत, तोपर्यंत त्यांचं कीर्तन होऊ देऊ नका”

कोरोनानंतर आता ‘या’ विषाणूचं सावट! युरोपातील अनेक देशात चिंतेचं वातावरण