भारतीय ‘अ’ संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी यांची निवड

मुंबई : भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या निवडीनंतर आता भारतीय ‘अ’ संघाच्या प्रशिक्षकपदी भारतीय महिला संघाचे माजी प्रशिक्षक रमेश पोवार यांची नियुत्ती करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी रमेश पोवार यांच्याकडे भारतीय ‘अ’ संघाचे गोलंदाजी पदाचे प्रशिक्षकपद सोपवण्यात आले आहे.

पोवार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक असताना त्यांचे वरिष्ठ महिला क्रिकेटपटू मिताली राजशी मतभेद झाले होते. भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठी त्यांनी पुन्हा अर्ज केला होता; परंतु कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सल्लागार समितीने डब्ल्यू. व्ही. रामन यांच्याकडे जबाबदारी सोपवली.

दोन कसोटी आणि ३१ एकदिवसीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पोवार यांची फक्त दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्धच्या मालिकेसाठीच ही नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी दिली. 

भारतीय ‘अ’ संघ दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध चार दिवसांचे दोन सामने आणि पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेला गुरुवारपासून तिरुवनंतपूरम येथे प्रारंभ होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-