नोरा आणि टेरेन्सचा मंचावरच रोमान्स, व्हिडीओ व्हायरल

मुंबई | अभिनेत्री नोरा फतेही ही एक अशी कलाकार आहे, जिने अगदी कमी वेळामध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. नोराच्या डान्सचे अनेक लोक दिवाणे आहेत. डान्सबरोबरच नोरा तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे ओळखली जाते.

सोशल मीडियावर नोराच्या डान्सचे वेगवेगळे व्हिडीओज नेहमीच व्हायरल होत असतात. सध्या नोराचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ देशातील टॉप रिअॅलिटी डान्सिंग शो ‘इंडियाज बेस्ट डान्स’च्या मंचावरील आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये नोरा टेरेन्स लुईससोबत डान्स करताना दिसत आहे. 1947 साली प्रदर्शित झालेल्या ‘अजनबी’ या चित्रपटातील ‘भिगी भिगी रातों में’ या गाण्यावर नोरा आणि टेरेन्स डान्स करताना दिसत आहेत.

या दोघांचा हा रोमँटिक डान्स पाहून उपस्थित सर्वांचेच होश उडाल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. डान्स करताना नोरा आणि टेरेन्स एकमेकांच्या रंगात रंगून गेल्याचं जाणवत आहे. यामध्ये नोराने निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. तर टेरेन्सने काळ्या रंगाचा सूट घातला आहे. या दोघांच्या केमिस्ट्रीने लोकांची मने जिंकली आहेत.

नोरा आणि टेरेन्सच्या या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. दोघांचेही चाहते व्हिडीओला भरभरून प्रेम देत आहेत. तसेच व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी नोरा आणि टेंरेन्सचं तोंडभरून कौतुक करत आहेत.

दरम्यान, नोरा फतेही सध्या तिच्या ‘भुज: द प्राईड ऑफ इंडिया’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटातील नोराच्या भूमिकेची सर्वत्र चर्चा रंगली आहे. ती अनेक रिअॅलिटी शोजमध्ये जज म्हणून दिसली आहे. नोरा ज्यावेळी मंचावर येते तेव्हा टाळ्यांचा एकच कडकडाट होत असतो.

नोरा फतेही ‘दिलबर’ आणि ‘गर्मी’ यांसारख्या गाण्यांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. नोराच्या ‘हाय गर्मी’ या स्टेपने संपूर्ण देशाला वेड लावलं होतं. ती एक उत्तम बेली डान्सर आहे. संपूर्ण देशभरातून नोराला भरपूर प्रेम मिळत असतं.

महत्वाच्या बातम्या –

मुलीच्या लग्नात हातात ग्लास घेऊन अनिल कपूरचा भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

माझ्या मुलांनी फिल्मस्टार बनू नये; दुसऱ्या मुलाला जन्म देताच करीनाने व्यक्त केली इच्छा

‘ही दोस्ती तुटायची नाय’ म्हणत कॅन्सरच्या उपचारानंतर दोन चिमुकल्यांची पहिली भेट, पाहा व्हिडीओ

राखी सावंतचा ‘स्पायडर मॅन’ डान्स होतोय सोशल मीडियावर व्हायरल, पाहा व्हिडीओ

लस घेतानी तरूणाने जे केलं ते पाहून नर्सही झाली हैराण, पाहा व्हायरल व्हिडीओ