एका आयटम साॅंगसाठी नोरा घेते तब्बल ‘इतकं’ मानधन; आकडा ऐकून व्हाल थक्क

मुंबई | बदलत्या तंत्रज्ञानासोबत आता प्रत्येक क्षेत्र बदलत आहे. अनेक क्षेत्रांमध्ये विविध पद्धतीनं नाविन्यता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशात मग भारतीय सिनेमा क्षेत्रामध्ये देखील नवीन गोष्टींचा समावेश  झाला आहे.

सध्या भारतीय सिनेसृष्टीत आयटम साॅंगचा जमाना आला आहे, असं सर्वजण बोलतात. मग या आयटम साॅंगसाठी काही अभिनेत्री भली मोठी रक्कम आकारत असल्याचं समोर आलं आहे.

आपल्या आकर्षक अदाकारीनं सिनेजगतात सर्वांच्याच मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या काही निवडक अभिनत्री सध्या प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये नोरा फतेहीचं नाव आघाडीवर आहे.

समंथा प्रभू, कतरिना कैफ, मलाइका अरोरा यांच्या आयटम साॅंगला देखील चाहते भरपूर पंसत करतात. परिणामी सध्या या अभिेनेत्रींनी आपल्या मानधनात भरपूर वाढ केली आहे.

काही दिवसांपूर्वी दिलबर हे आयटम साॅंग प्रचंड गाजत होतं. आपल्या आकर्षक आदांनी नोरानं या गाण्याला चार चाॅंद लावले होते. या गाण्याच्या माध्यमातून नोरा फतेही खूप प्रसिद्ध झाली.

नोरा फतेही एका आयटम साॅंगसाठी तब्बल 50 लाख रूपये घेत असल्याची माहिती आता समोर आली आहे. मानधनाचा आकडा इतका मोठा असणारी नोरा फतेही सध्या ग्लामर गर्ल आहे.

काही दिवसांपासून नोरा फतेही मोठ्या वादात अडकल्याचं पाहायला मिळालं होतं. अशातही तिच्या गाण्यानं सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. परिणामी नोराची मागणी आता वाढली आहे.

कतरिना एका आयटम साॅंगसाठी तब्बल 50 लाख घेते. नुकतंच कतरिनानं टीप टीप बरसा पानी या गाण्यावर आयटम साॅंग सादर केलं होतं. मुन्नी बदनाम हुई या आयटम साॅंगनं तर काही वर्षांपुर्वी धुमाकूळ घातला होता. त्या मलाइकाला एका गाण्यासाठी तब्बल 1 कोटी दिले जातात.

दरम्यान, सध्या बाॅलिवूड असो की अन्य कोणत्याही भाषेतील सिनेमा त्या सिनेमात आयटम साॅंग हे ठरलेलं आहे. परिणामी अभिनेत्रींच्या मानधनात प्रचंड मोठी वाढ झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 सानिया मिर्झाची निवृत्तीची घोषणा; ‘या’ कारणामुळे सोडणार टेनिसचं कोर्ट

अखेर डुग्गू सापडला! बेपत्ता स्वर्णव सापडल्यानं आई-वडिल भावूक

रावसाहेब दानवेंना जोर का झटका; सोयगाव नगरपंचायतीत शिवसेनेनं मारली बाजी 

नारायण राणेंना शिवसेनेचा ‘दे धक्का’, शेवटच्या क्षणी एका आकड्याने… 

ज्युनिअर आर. आर. पाटलांचा धमाका, एकहाती सत्ता मिळवत विरोधकांना ‘बाप’ दाखवला!