विराटच्या थ्रोवर बावूमा भडकला अन् भर मैदानात वातावरण तापलं; पाहा व्हिडीओ

मुंबई | भारत आणि दक्षिण अफ्रिका (IndVsSa) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज खेळला जात आहे. बोलंड पार्कच्या पर्लवर हा सामना खेळला जातोय.

एकदिवसीय सामन्याचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्यानं आता भारताचा स्टार फलंदाज के एल राहुल कर्णधारपद सांभाळत आहे. तर माजी कर्णधार विराट कोहली देखील राहुलच्या नेतृत्वाखाली खेळत आहे.

अशातच कर्णधारपद सोडल्यानंतर पहिल्याच सामन्यात कोहलीचा राग पहायला मिळाला. आजच्या सामन्यात कोहली आणि दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार आमने सामने आल्याचं पहायला मिळालं.

भारताची गोलंदाजी सुरू होती. 18 षटकात 70 वर 3 गडी बाद झाल्यानंतर बावूमा आणि रासी व्हॅन डर डुसेनने दक्षिण अफ्रिकेची फलंदाजी सावरली. 35 व्या षटकापर्यंत दोघांनी 100 धावांची भागेदारी केली होती.

36 वं षटक टाकण्यासाठी भारताच्या जयुवेंद्र चहलला धाडण्यात आलं. त्यावेळी 4 थ्या चेंडूवर बावूमाने चेंडू कोहलीकडे प्लेस केला. त्यावेळी कोहली आक्रमक फलंदाजी करत होती.

कोहलीकडे चेंडू आल्यावर कोहलीने स्टाईक स्टंपकडे थ्रो केला. त्यावेळी बावूमा स्टंपच्या शेजारी उभा होता. त्यावेळी दोघांमध्ये चांगलाच वाद पेटला.

बावूमाने विराटच्या थ्रोमुळे धाव घेता आली नाही. त्यावेळी बावूमाने त्याच्याकडे रागात पहिलं. त्यावेळी बावूमा कोहलीला काही बोलला नाही. मात्र, कोहलीने यावेळी त्याला दोन्ही हात वर करून काय?, असं म्हणाला.

त्यावरून बावूमाने वाद न वाढवण्याची भूमिका घेतली आणि कोहलीला उत्तर दिलं नाही. त्यामुळे मैदानात वाद टाळता आलं.

दरम्यान, या प्रकरणामुळे आता कोहलीवर जोरदार टीका होताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी कोहलीला शांत राहण्याचं आवाहन केलं आहे.

पाहा व्हिडीओ –


महत्त्वाच्या बातम्या – 

मुख्यध्यापकाच्या ऑफिसमध्ये राडा, बोलता बोलता झालं असं की…; पाहा व्हिडीओ

रावसाहेब दानवेंना जोर का झटका; सोयगाव नगरपंचायतीत शिवसेनेनं मारली बाजी 

नारायण राणेंना शिवसेनेचा ‘दे धक्का’, शेवटच्या क्षणी एका आकड्याने… 

ज्युनिअर आर. आर. पाटलांचा धमाका, एकहाती सत्ता मिळवत विरोधकांना ‘बाप’ दाखवला! 

रोहित पवारांचा राम शिंदेंना धक्का; कर्जत नगरपंचायतीवर मिळवली एकहाती सत्ता