धक्कादायक! एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल चारवेळा कोरोना लस घेतली, तरीही…

लखनऊ | कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वाढता चालला आहे. कोरोना व्हायरस आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटची (Omicron Variant) लागण झालेल्या रुग्णांचा आकडा वाढतोय. अशात सर्वांच्या चिंतेत भर टाकणारी बातमी समोर आली आहे.

एका महिलेने कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे एक नव्हे, दोन नव्हे तब्बल चार डोस घेतल्यानंतरही तिला कोरोनाने गाठलं आहे. कोरोना लसीचे चार डोस घेतलेल्या महिलेला कोरोनाची लागण झाली आहे.

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये बुधवारी हा प्रकार उघड झालाय. येथील देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका 44 वर्षीय महिलेची कोरोना चाचणी केली असता तिला कोरोना झाल्याचं समोर आलं. यानंतर महिलेला एअर इंडियाच्या इंदूर-दुबई विमानामध्ये प्रवास करण्यास मनाई करण्यात आली असून तिला एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या महिलेने जानेवारी ते ऑगस्ट 21 दरम्यान अनुक्रमे सिनोफार्म आणि फायझरच्या अँटी-कोविड लसींचे प्रत्येकी दोन डोस घेतले होते. या महिलेची विमानतळावर कोरोना चाचणी केली असता तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

महिलेच्या शरीरात कोरोनाचं कोणतंही लक्षण दिसत नव्हतं. मात्र चार दिवसांपूर्वीपासून सर्दी-खोकल्याचा त्रास होत असल्याचं तिनं विमानतळावरील आरोग्य विभागाच्या पथकाला सांगितलं.

लस घेतल्यानंतर तुम्हाला कोरोना आजार होणारच नाही, असा समज करून तुम्ही जर कोरोना अनुषंगाने असणाऱ्या नियमावलीचं पालन करणं गरजेचं आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या ‘ओमिक्रॉन’ (Omicron) या नवीन व्हेरिएंटची दहशत सर्वत्र पसरण्यास सुरुवात झाली आहे. ओमिक्रॉनबाबत जगभरातून भीतीदायक आकडेवारी समोर येऊ लागली आहे. युरोपमध्ये तर ओमिक्रॉननं धुमाकूळ घातला आहे.

भारतातदेखील याचा शिरकाव झाला असून तो वेगाने पसरत आहे. कोरोनामुळे मानवी जीवनावर भयंकर वाईट परिणाम झाला आहे. आतापर्यंत लाखो लोकांचा बळी घेणारा हा विषाणू आजही जगात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“आम्ही मोदींचं अनुकरण करतो, ते मास्क लावत नाहीत म्हणून आम्हीही लावत नाही”

महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालीचरणला अखेर अटक! 

कोरोना कधी संपणार?; तज्ज्ञांनी दिली दिलासादायक बातमी

‘कोरोनाची त्सुनामी येणार आणि…’; WHO ने दिलेल्या माहितीने जगाचं टेंशन वाढलं  

कोरोनाचा ‘या’ अवयवावर होतोय गंभीर परिणाम?; धक्कादायक माहिती समोर