बाप-लेक अडचणीत! नितेश राणेंनंतर आता नारायण राणेंनाही पोलिसांची नोटीस

मुंबई | राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. कोकणाच्या राजकीय भूमीतील राणे कुटुंब आणि शिवसेनेतील वाद आता टोकाला गेला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता तशीच परिस्थिती आमदार नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर निर्माण झाली आहे.

नितेश राणे यांनी राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. परिणामी मोठा वाद निर्माण झाला आहे.

नितेश राणे यांची सध्या शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी मोठी धावपळ होताना दिसत आहे. त्यांना अटकपुर्व जामीन देण्यास न्यायालयानं नकार दिल्यानं आता त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

28 तारखेला नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत नितेश राणे यांच्यावर झालेल्या कारवाईवरून शिवसेनेवर टीका केली होती. याच पत्रकार परिषदेत त्यांनी नितेश राणे हे कुठं आहेत हे सांगायला काय मुर्ख आहोत का? असं वक्तव्य केलं होतं.

नारायण राणे यांना कणकवली पोलिसांनी नोटीस बजावली असून त्यांना चौकशीला हजर व्हावं लागणार आहे. परिणामी त्यांच्याकडून आता नितेश राणे यांच्याबद्दल माहिती घेतली जाणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत याच्या अत्यंत जवळचे असणारे संतोष परब यांच्यावर कणकवलीमध्ये हल्ला झाला होता. तेव्हापासून हे प्रकरण गाजत आहे.

हे प्रकरण चालू असतानाच नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवल्यानं परत एकदा नितेश राणे यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. परिणामी सध्या कणकवली भागात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

दरम्यान, नितेश राणे हे सध्या गायब आहेत. परिणामी नारायण राणे यांच्याकडून त्यांच्याबद्दल माहिती घेण्यात येत आहे. या प्रकरणानं शिवसेना आणि राणे यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे हे मात्र नक्की.

महत्वाच्या बातम्या-

नितेश राणेंना अटक होणार?; न्यायालयाचा नितेश राणेंना झटका

‘…हा धोक्याचा अलार्म आहे’; लॉकडाऊनबाबत राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, 500 चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना दिलासा

“तुम्ही माझ्यावर दबाव आणू शकत नाही, पत्रातले धमकीवजा शब्द पाहून मी…”

“1 कोटी दारू पिणाऱ्यांनी आम्हाला मत द्यावं, सत्ता आल्यास आम्ही…”